शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
4
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
5
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
6
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
7
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
8
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
9
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
10
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
11
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
12
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
13
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
14
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
15
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
16
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
17
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
18
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
19
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
20
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल चार्जरच्या केबलने गळा आवळून पत्नीचा खून; आरोपी पती गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 17:37 IST

Murder : टेंभूरखेडा येथील घटना

ठळक मुद्देअंकिता दीपक जिचकार (२३ रा. सावंगी, ह.मु. टेंभूरखेडा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी वरूड पोलिसांनी आरोपी पती दीपक राजेंद्र जिचकार (२९ रा. सावंगी, ह.मु. पुसला) याला अटक केली.

वरूड (अमरावती) : माहेरी आलेल्या पत्नीची मोबाईल चार्जरच्या केबलने गळा आवळून हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना तालुक्यातील टेंभुरखेडा येथे ४ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली. अंकिता दीपक जिचकार (२३ रा. सावंगी, ह.मु. टेंभूरखेडा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी वरूड पोलिसांनी आरोपी पती दीपक राजेंद्र जिचकार (२९ रा. सावंगी, ह.मु. पुसला) याला अटक केली. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.             

अंकिता व दीपकचा एक वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला. परंतु काही दिवसांपासून एकमेकांमध्ये वाद होत असल्याने अंकिता ही माहेरी आई वडिलांकडे टेंभुरखेडा येथे वास्तव्यास होती. सासरी आरोपीची ये-जा होती. दरम्यान आरोपी दीपकने अंकिताच्या बहिणीच्या साक्षगंधाला विरोध केल्याने तिच्या आई वडिलांनी दीपकला घरातून काढून दिले होते. ' मी एका एकाला पाहून घेईन ' अशी धमकी देऊन तो गावी परतला.

दरम्यान ४ फेब्रुवारी रोजी दीपक टेंभुरखेडा येथे पोहोचला. तेथे दुपारी घरात कोणी नसल्याची संधी साधून त्याने पत्नी अंकिता हिची गळा आवळून हत्या केली. गुरुवारी दुपारी ४ वाजताच सुमारास तिचे आईवडील घरी येताच ही घटना उघडकीस आली. या घटनेची फिर्याद मृताची लहान बहीण अमृता सुधाकर अळसपुरे (२२ रा. टेंभूरखेडा) हिने वरूड पोलीस ठाण्यात दिली. यावरून जरुड बिट जमादार मनोज कळसकर यांनी घटनास्थळ घाटहून पंचनामा केला.

घटनेनंतर आरोपी पसारपत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी दीपक जिचकारने टेंभुरखेड्याहून पळ काढला. रात्री ९ च्या सुमारास तक्रार दाखल करून घेतल्यानंतर वरूड पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला पुसला येथून रात्री ९ च्या दरम्यान अटक केली. त्याचेविरुद्ध भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे, ठाणेदार प्रदीप चौगावकर, एपीआय संघरक्षक भगत यांनी भेट दिली.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटकAmravatiअमरावतीMobileमोबाइल