लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या शेलगाव देशमुख येथील गणेश भिकाजी पहारे याने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून गेल्याची घटना ३ मार्च रोजी रात्री घडली. या प्रकरणी डोणगाव पोलिसांनी मृत महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून गुरुवारी मध्यरात्री गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपी गणेश भिकाजी पहारे यास अटक करण्यात आली आहे.शेलगाव देशमुख येथील गणेश पहारे याचे नर्मदाबाई हिच्याशी २००२ मध्ये लग्न झाले होते. या दाम्पत्याला एकूण पाच अपत्ये आहेत. मात्र गणेश पहारे हा पत्नीच्या चारित्र्यावर नेहमीच संशय घेत होता. त्यातून तिला शारीरिक व मानसिक त्रास देत होता. दरम्यान, ३ मार्च रोजी रात्री उभयतांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यावेळी रागाच्या भरात गणेश पहारे याने नर्मदा (३७) हिचा गळा आवळून खून केला. या घटनेची माहिती मृत नर्मदाचा भाऊ रवी सुखेदव सिमरे (रा. मालेगाव, जि. वाशिम) यास मिळाली. त्यावरून त्याने डोणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ही तक्रार व वैद्यकीय अधिकारी यांचा शवविच्छेदन अहवाल याचा आधार घेत आरोपी गणेश पहारे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार दीपक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी राठोड हे करीत आहेत.
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 11:21 IST
Murder by strangulation of wife रागाच्या भरात गणेश पहारे याने नर्मदा (३७) हिचा गळा आवळून खून केला.
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून
ठळक मुद्देगणेश पहारे हा पत्नीच्या चारित्र्यावर नेहमीच संशय घेत होता. त्यातून तिला शारीरिक व मानसिक त्रास देत होता.३ मार्च रोजी रात्री उभयतांमध्ये पुन्हा वाद झाला.