शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

थरारक! पत्नीच्या हत्येप्रकरणी साक्ष देण्यासाठी आलेला पती, न्यायालयाच्या आवारात गोळ्या घालून केले ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 22:01 IST

Firing Case : पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला.

हरियाणातील सोनीपत जिल्हा न्यायालय परिसरात गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा न्यायालयाच्या चेंबर क्रमांक 207 बाहेर वेदप्रकाश नावाच्या व्यक्तीची दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आणि घटनास्थळावरून पळ काढला. हत्येची माहिती मिळताच सोनीपत पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला.मुकीमपूर गावातील रहिवासी असलेल्या वेदप्रकाशने गेल्या वर्षी गावात राहणाऱ्या कनिका नावाच्या मुलीशी लग्न केले. तेव्हापासून वेदप्रकाश आणि कनिकाच्या कुटुंबात वाद सुरू होता. मुलीचे वडील विजय पाल यांनी आपल्या एका साथीदारासह आधी मुलगी कनिकाची हत्या केली आणि नंतर तिचा मृतदेह गंगा कालव्यात फेकल्याचा आरोप आहे.वेदप्रकाश हा पत्नीच्या हत्येच्या खटल्यातील मुख्य साक्षीदार होता आणि तो न्यायालयात साक्ष देण्यासाठी आला असता, 207 क्रमांकाच्या चेंबरच्या बाहेर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. गुन्हा केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. याआधीही सोनीपत न्यायालयात अनेकदा असे गुन्हे घडले आहेत.या प्रकरणाची माहिती देताना शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी वजीर सिंह यांनी सांगितले की, वेदप्रकाश नावाच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. वेद प्रकाशने गेल्या वर्षी गावातील कनिकाशी लग्न केले होते आणि कनिकाची हत्या तिचे वडील विजयपाल यांनी केल्याचा आरोप आहे.वेदप्रकाश हा या खटल्यातील मुख्य साक्षीदार असून तो आज (शुक्रवारी) न्यायालयात साक्ष देण्यासाठी आला होता, त्यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडून त्याला ठार केले. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींच्या अटकेचे प्रयत्न सुरु केले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHaryanaहरयाणाPoliceपोलिसFiringगोळीबारCourtन्यायालय