शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

मित्राच्या डोक्यात कुऱ्हाड घालून केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 05:57 IST

सफाळे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी पळून गेल्याचे पाहिल्यावर पोलिसांनी सफाळे येथील जंगलात शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही.

ठळक मुद्देसफाळे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी पळून गेल्याचे पाहिल्यावर पोलिसांनी सफाळे येथील जंगलात शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर/सफाळे : सफाळे येथे दोन मित्रांमध्ये झालेल्या भांडणात अंकुश लहू वरठा या १९ वर्षीय आरोपीने आपला मित्र धीरज रामप्रसाद गौड (वय २४) याचा त्याच्या पत्नीसमोरच डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. फरार झालेल्या आरोपीला उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक आणि त्यांच्या टीमने डहाणू येथून अटक करण्यात यश मिळविले आहे.सफाळे येथील सरूपाडा येथे राहणारे दोन मित्र बिगारी काम करीत असत. दारू प्यायल्यानंतर या दोन्ही मित्रांमध्ये नेहमी भांडणे होत असत. शनिवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास सफाळेमध्ये एका दुकानासमोर दोघांचे भांडण झाले. यावेळी आरोपी आपल्या हातात कोयता घेऊन आल्यानंतर उपस्थित काही लोकांनी त्यांचे भांडण मिटविले. नंतर मयत आपल्या घरी निघून गेला. काही वेळानंतर हातात कुऱ्हाड घेऊन आरोपी मयत धीरज याच्या घरी आला आणि झोपलेल्या धीरजच्या डोक्यात त्याच्या पत्नीच्या समोरच कुऱ्हाड घातली. रक्ताच्या थारोळ्यात तडफडत पडलेल्या आपल्या मित्राला पाहून भानावर आलेल्या आरोपीने पळ काढला. 

सफाळे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी पळून गेल्याचे पाहिल्यावर पोलिसांनी सफाळे येथील जंगलात शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. रविवारी पहाटे लोकल पकडून डहाणू येथील एका आदिवासीपाड्यात लपून बसलेल्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद करण्यात यश मिळविले. मयत धीरज याला उपचारासाठी नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आरोपीविरोधात सफाळे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून सफाळे पोलीस पुढील तपास करीत असल्याची माहिती सपोनि कहाळे यांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस