शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानमध्ये पोलीस निरीक्षक आणि कॉन्स्टेबलची हत्या करणारे तिघेजण पुण्यातून जेरबंद   

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 14:35 IST

राजस्थानमधील फतेहपूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक आणि हवालदार यांची हत्या करुन फरार झालेल्या तिघांना गुन्हे शाखेने पुण्यात रात्रभर सर्च आॅपरेशन करुन अटक केली़.

पुणे - राजस्थानमधील फतेहपूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक आणि हवालदार यांची हत्या करुन फरार झालेल्या तिघांना गुन्हे शाखेने पुण्यात रात्रभर सर्च आॅपरेशन करुन अटक केली़.  विभोरसिंह, साकेतसिंह आणि रामपाल गिरीधारीलाल रनैवाल अशी त्यांची नावे आहेत. याबाबतची माहिती अशी, पोलीस निरीक्षक मुकेश कानुनगो आणि पोलीस काँस्टेबल रामप्रकाश अशी शहीद झालेल्या पोलिसांची नावे आहेत.  कुप्रसिद्ध गुंड अजय चौधरी व त्याची टोळी फतेहपूर येथे असल्याची माहिती मुकेश कानुनगो यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गेल्या शनिवारी रात्री बेसवा गावाजवळ त्यांचा पाठलाग केला. मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस व गुंड समोरासमोर आल्यावर त्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस निरीक्षक आणि पोलीस काँस्टेबल यांना गोळ्या लागून त्यात ते शहीद झाले होते़ यामुळे संपूर्ण राजस्थानामध्ये मोठी खळबळ उडाली होती.राजस्थान पोलिसांनी या टोळीला पकडण्यासाठी संपूर्ण ताकद लावली आहे. त्यांचे काही जण पुण्यात असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार राजस्थान पोलिसांचे पथक शनिवारी पुण्यात आले होते़ राजस्थानच्या महासंचालकांनी महाराष्ट्राचे महासंचालक दत्ता पडसलगीर यांना याची माहिती दिली़ त्यांनी पोलीस आयुक्त डॉ़ के व्यंकटेशम यांना कळविले. गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथक, खंडणी विरोधी पथक यांची शनिवारी सायंकाळी पथके तयार करण्यात आली़. राजस्थान पोलिसांनी संशयित गुंडांचे फोटो पुणे पोलिसांना दिले होते़ त्यांच्या मोबाईलवरुन लोकेशन घेण्यात आले़ ते बावधन येथील निघाले़ त्यानुसार, संपूर्ण बावधन परिसरात रात्री शोध मोहिम सुरु करण्यात आली. तेथील विविध इमारतीत राहणा-या लोकांची माहिती घेण्यात येऊ लागली़ काही इमारतींची माहिती घेतल्यावर एका इमारतीत ११ जण रहात आल्याचे आढळून आले.  त्या सर्वांची तपासणी करण्यास सुरुवात केली.  त्यांचे फोटो पोलिसांकडे होते़ ते तिघे त्या आढळून आले़. त्यांना ताब्यात घेऊन पोलीसी हिसका दाखविल्यानंतर त्यांनी त्यांनी गुन्हा कबुल केला. त्यानंतर पहाटे त्यांना राजस्थान पोलिसांच्या हवाली करण्यात आले.पोलीस आयुक्त डॉ़ के़. व्यंकटेशम, अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, राजेंद्र कदम व त्यांच्या पथकांनी ही कामगिरी केली़.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे