शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खिचडीत मीठ जास्त झाल्याने पत्नीची हत्या; भाईंदरला १२ वर्षांच्या मुलासमोरच घडले कृत्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 11:02 IST

भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक तुषार माळोदे यांनीच या थरकाप उडवणाऱ्या हत्याकांडाची फिर्याद दिली आहे.

मीरा रोड : साबुदाणा खिचडीत मीठ जास्त झाल्याने १२ वर्षीय मुलाच्या डोळ्यांदेखत वडिलांनी आईची गळा आवळून हत्या केली. आईला सोडा म्हणून मुलाने आकांत केला, मात्र बापाने त्याचेही ऐकले नाही. हत्या केल्यानंतर स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन त्याने पत्नीची हत्या केल्याचे सांगितले. 

भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक तुषार माळोदे यांनीच या थरकाप उडवणाऱ्या हत्याकांडाची फिर्याद दिली आहे. माळोदे हे शुक्रवारी सकाळी पोलीस ठाण्यात असताना ९.४५ च्या सुमारास एक व्यक्ती आली व त्याने पत्नी निर्मला (४०) हिचा गळा आवळल्याचे सांगितले. निकेश राजाराम घाग (४६, गाेडदेव नाका) असे त्याने नाव सांगितले. पोलिसांनी त्याच्यासह रोहिणी इमारत गाठली असता तेथे गर्दी जमली होती. निर्मला यांना रिक्षातून नजीकच्या खासगी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत जाहीर केले. 

बँकेत काम करणाऱ्या निकेशचा शुक्रवारी उपवास असल्याने निर्मला यांनी साबुदाण्याची खिचडी बनवली होती. त्यात मीठ जास्त झाल्याने  निकेशचे पत्नीसोबत भांडण झाले. त्यानंतर त्याने मारहाण करून तिला खाली पाडले आणि हाताने तिचा गळा दाबला. 

पत्नीने प्रतिकार केला असता नायलॉनची दोरी आणून त्याने पत्नीचा गळा आवळला. आईला वाचविण्यासाठी मुलाने प्रयत्न केला, पण त्याचा निकेशवर काहीच परिणाम झाला नाही. त्यानंतर निकेश घरातून निघून गेला. नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून निकेश याला अटक केली आहे. 

नातवाने फाेन करून कळवले आजीला -- घाग दाम्पत्याच्या मुलाने शुक्रवारी सकाळी ही घटना आजी शेवंती गुरव यांना फाेन करून सांगितली. शेवंती गुरव यांनी ही माहिती मुलगा प्रभाकर यास दिली. प्रभाकर हे पत्नी व मित्र दिनेशसह घटनास्थळी पाेहाेचले आणि निपचित पडलेल्या बहिणीला रुग्णालयात नेले. - तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. निर्मला यांचा भाऊ प्रभाकर गुरव यांच्याकडून पोलिसांनी माहिती घेतली. त्यांनी १५ दिवसांपासून निकेश व निर्मला यांच्यात घरगुती भांडणे सुरू होती, असे सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिस