शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बार कामगाराची हत्या, वाशीतील घटना, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 08:57 IST

बारमध्ये सफाई काम करणारा  मोंटू यादव (२६) हा काम उरकून घरी चालला होता. बारपासून काही अंतरावर तो बसची वाट पाहत उभा राहिला. त्यावेळी मोटारसायकलवर आलेल्या दोघांपैकी एकाने त्याला लुटण्याचा प्रयत्न केला.

नवी मुंबई : बारबाहेर दबा धरून बसलेल्या दोघांनी केलेल्या हल्ल्यात बार कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना जुहूगाव येथील किनारा बार येथे गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. बारचा मॅनेजर समजून हल्लेखोरांनी हल्ला केल्याची शक्यता वर्तविली जात असून, या प्रकरणी वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

बारमध्ये सफाई काम करणारा  मोंटू यादव (२६) हा काम उरकून घरी चालला होता. बारपासून काही अंतरावर तो बसची वाट पाहत उभा राहिला. त्यावेळी मोटारसायकलवर आलेल्या दोघांपैकी एकाने त्याला लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुकेशने प्रतिकार केल्याने त्याने धारदार शस्त्राने त्याच्या छातीत भोसकले. यानंतरही त्यांच्यात झटापट सुरू होती.

मदतीसाठी मुकेश आरडाओरडा करताच बारचा सुरक्षारक्षक दिनेश यादव मदतीसाठी धावून आला. त्या हल्लेखोराने त्याच्यावरही वार करून मोटारसायकलवरून पळ काढला. या घटनेनंतर दोघांनाही जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मुकेशचा मृत्यू झाला. तर, दिनेशवर उपचार सुरू आहेत. 

छातीत घुसवले हत्यारमुकेशवर हल्ला करणाऱ्यांनी वार इतक्या ताकदीने केला आहे की त्याच्या छातीवर खोलवर जखम झाली आहे. त्यामुळे हल्लेखोर नशेत होते का, यासोबतच त्यांचा हल्ल्याचा नेमका उद्देश काय, असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून, पोलिसांचा त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. बहिणीच्या लग्नासाठी जाणार होता गावी मुकेश हा मूळचा झारखंडचा असून, त्याच्या बहिणीचे काही दिवसांनी लग्न आहे. त्यासाठी तो शुक्रवारपासून सुटीवर जाणार होता. त्यापूर्वी ही घटना घडल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मॅनेजर समजून हल्ला?मुकेश हा बोनकोडे परिसरात राहणारा असून, नेहमी बारची साफसफाई केल्यानंतर बारमधील अन्न, फळे बॅगमध्ये घेऊन जात असे. गुरुवारी पहाटेदेखील तो बॅगमध्ये फळे घेऊन चालला होता. घटनेनंतर पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपासात संशयित मोटारसायकलची माहिती पोलिसांच्या हाती लागली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी