शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! पीपीई किट घातलेल्या नर्सचा आढळला मृतदेह; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 15:04 IST

Crime News : पोलिसांनी याप्रकरणाचा अधिक तपास केला असता खळबळजनक माहिती समोर आली आली.

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. याच दरम्यान एक भयंकर घटना समोर आली आहे. गुजरातच्या वडोदरामध्ये पीपीई किट घातलेल्या एका नर्सचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. वडोदरातील गोत्री परिसरातील वैकुंठ सोसायटीजवळ तिचा मृतदेह सापडला होता. 

पोलिसांनी याप्रकरणाचा अधिक तपास केला असता खळबळजनक माहिती आता समोर आली आली. धक्कादायक बाब म्हणजे नर्सच्या पतीनेच तिची हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पोलिसांनी माहितीनुसार, शिल्पा पटेल 39 वर्षीय मृत नर्सचं नाव आहे. वडोदरातील एका रुग्णालयात त्या नोकरी करत होत्या. गोत्री परिसरात त्यांचा मृतदेह सापडला होता. 

कामावर जात असताना पतीने त्यांची हत्या केली आणि रस्त्यात तिचा मृतदेह ठेवून तो फरार झाला. पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली असता त्यांना नर्सच्या पतीवर संशय आला. त्यावेळी त्यांनी अधिक तपास केला असता पतीने हत्या केल्याची कबुली दिली. गेल्या वर्षभरापासून या पती-पत्नीत वाद होत होते. तसेच शिल्पा यांनी देखील पतीला आत्महत्येची धमकी दिली होती अशी माहिती आरोपीने पोलिसांना दिली आहे. 

सतत वाद होत असल्याने रागाच्या भरात आरोपीने अशा प्रकारे टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी नर्सच्या पतीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशामध्ये कोरोनाने थैमान घातलेलं असतानाच अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये पोलिसांच्या टीमवर हल्ला केल्याच्या आरोपावरून एका काँग्रेस आमदाराच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. 

दारुच्या नशेत काँग्रेस आमदाराच्या मुलाचा पोलिसांच्या टीमवर हल्ला; 3 जणांना अटक

पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी कर्नाटकमधील काँग्रेस आमदार नसीर अहमद यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. फैयाज असं नसीर अहमद यांच्या मुलाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री कर्तव्यावर असणाऱ्या बंगळुरू पोलिसांच्या टीमवर दारुच्या नशेत असलेल्या फैयाजने प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी फैयाजसोबत आणखी दोन जणांना अटक केली आहे. पोलिसांवर केलेल्या हल्ल्यानंतर तो काही वेळ फरार होता. रात्री साडे बाराच्या वाजण्याच्या सुमारास बंगळुरुमधील अमृथल्ली पोलीस स्टेशनजवळ हा सगळा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGujaratगुजरातPoliceपोलिसArrestअटक