शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

हडपसरमध्ये सराईत गुन्हेगाराची हत्या, पूर्ववैमनस्यातून केले कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 10:05 IST

हत्या झालेली व्यक्ती हडपसर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होती. त्याच्यावर मारहाणीचे अनेक गुुन्हे दाखल आहेत.

पुणे - पुण्यातील सराईत गुन्हेगाराचा पूर्ववैमन्यातून कोयत्याने वार करून खून करण्यात आला आहे. शोएब मस्जीद शेख (वय १९, रा. भेकराईनगर, हडपसर) असे खुन झालेल्याचे नाव आहे. ही घटना भेकराईनगरमधील सासवड रोडवरील शारदा हॉस्पिटलशेजारील गल्लीत शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजता घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ७ ते ८ जण दिसून येत आहेत. याप्रकरणी निलेश भाऊसाहेब मेमाणे (वय २६, रा. ढमाळवाडी, भेकराईनगर, हडपसर) या टेम्पोचालकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार हडपसर पोलिसांनी जीवन कांबळे व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोएब हा हडपसर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर मारहाणीचे अनेक गुुन्हे दाखल आहेत. आरोपी जीवन कांबळे व शोएब एकाच परिसरात राहणारे आहेत. पूर्वी ते मित्र होते. ऑक्टोंबर २०१८ मध्ये शोएब व जीवन कांबळे त्यांच्यात वाद झाला होता. तेव्हा शोएब याने त्याला मारहाण केली होती. त्याचा राग कांबळे याच्या मनात होता. त्याचा बदला घेण्याची तो संधी शोधत होता. जीवन कांबळे याच्यावरही शारिराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. दोघांवरही खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होता. गेल्या वर्षी  निवडणुकीपूर्वी त्यांना जामीन मिळाला होता.शोएब हा राज सरकार हा गु्रप चालवत होता. शुक्रवारी सकाळी तो जीवन कांबळे याच्या घरासमोर गेला व त्याने शिवीगाळ केली होती. त्यामुळे जीवन कांबळे व त्याच्या साथीदारांनी काल रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास भेकराईनगर येथे एकट्याला गाठले व त्याच्यावर कोयत्याने वार करुन त्याचा निर्घुण खुन केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सुहास बावचे व अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी जीवन कांबळे याच्याबरोबर असणार्‍या तिघांना ताब्यात घेतले असून कांबळेचा शोध घेण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे