शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाच्या त्रिकोणातून खून, चौघांवर गुन्हा दाखल, एकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 21:26 IST

खून करून अपघाताचा केला बहाणा, आरोपी हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

चाकण - प्रेमाच्या त्रिकोणातून चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आळंदी रोडवरील रासे गावच्या गायरानात एकाचा खून करण्यात आला असून याप्रकरणी आज  रात्री पाच जणांवर आज खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचपैकी एका आरोपीस चाकण पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार व उपनिरीक्षक संजय नीलपत्रेवार यांनी दिली. आरोपींनी अपघाताचा बनाव करून खून केलेल्या व्यक्तीस संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल मध्ये सोडून पलायन केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना शुक्रवारी १४ सप्टेंबरला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आळंदी रोड वरील रोटाई मंदिरापासून पुढे फॉरेस्टलगत असणाऱ्या रासे गावच्या हद्दीतील गायरान जागेत घडली. नामदेव नागोराव जाधव ( वय ३२, रा. डोंगरवस्ती, निघोजे, ता.खेड, जि.पुणे, मुळगाव तारदवाडी, पो. येवती, ता.मुखेड, जि. नांदेड ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद नामदेवच्या भाऊ व्यंकट नागोराव जाधव ( वय २८, रा. विमाननगर, पुणे ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी अक्षय दीपक सोनवणे ( रा. चिंबळी, ता.खेड, जि.पुणे ), अविनाश उर्फ अविराज रोहिदास देडे ( वय २२, रा. टॉवर जवळ, गणपती मंदिराच्या पाठीमागे, आदर्षनगर, मोशी, पुणे ), आदित्य मुऱ्हे ( रा. मुर्हेवस्ती, कुरुळी, ता.खेड, जि.पुणे ), महादेव भाग्यवंत ( रा.मोशी, पुणे ), आकाश गायकवाड ( रा. धावडेवस्ती, भोसरी, पुणे ) या पाच जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अविनाश उर्फ अविराज रोहिदास देडे यास चाकण पोलिसांनी अटक केली आहे. अविनाश याने घडलेला सर्व प्रसंग पोलिसांसमोर कथन केला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, मयत नामदेव हा सायली इंटरप्रायजेस मध्ये सुपरवायझर चे काम करीत होता व सुपरजित कंपनीला मॅनपॉवर सप्लाय करीत होता. नामदेवचे दीपाली नावाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध असूनही प्रेमसंबंधाची माहिती न देता नात्यातील मुलीशी त्याने लग्न केले. त्याच्या बायकोला दिपालीशी असणारे प्रेमसंबंध कळल्याने त्यांनी फारकत घेतली होती. व दिपालीशीही त्याचे पटत नव्हते. त्यानंतर नामदेवचे हर्षदा नावाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले. परंतु हर्षदा वर अक्षय सोनवणे याचेही प्रेम होते. व अक्षयला हर्षदाशी लग्न करायचे होते. नामदेवला वारंवार समजावून सांगुनहि त्यांचे प्रेमसंबंध सुरूच होते. त्यामुळे अक्षय हा हर्षदावरून नामदेव यास नेहमी त्रास व धमकी देत होता. आणि यातूनच त्याने नामदेवचा काटा काढण्याचे ठरविले. शुक्रवारी ( दि. १४ ) रोजी दुपारी एक वाजता यातील आरोपींनी नामदेवचा कायमचा काटा काढण्यासाठी चिंबळी फाट्यावर बोलावून घेतले. तेथून सर्वानी गोड बोलून आळंदी रोडवरील जंगल भागात नेले. व रासे गावच्या हद्दीत आरोपींनी नामदेवला काठीने व चामडी पट्ट्याने मारहाण केली. नामदेव बेशुद्ध पडला असता त्याला दुचाकीवर टाकून त्याचा अपघात झाला असल्याचे सांगून त्यास सायंकाळी पावणे सातच्या सुमारास भोसरी येथील संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल मध्ये सोडून सर्वानी पलायन केले. हे सर्व आरोपी हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय नीलपत्रेवार पुढील तपास करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून