शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

शेलू येथे मजुराचा क्षुल्लक कारणावरून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 23:56 IST

मध्य रेल्वेचे उपनगरीय स्थानक असलेल्या शेलू गावात मोठ्या प्रमाणात बांधकाम साइट आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : तालुक्यातील शेलू गावात एका बांधकाम साइटवर काम करणाऱ्या मजुराचा खून झाला आहे. लॉकडाउन असल्याने दोघे मजूर राहत असलेल्या चाळीमधून गप्पा मारण्यासाठी एका कार्यालयाच्या बाहेर रात्री बसले होते. यावेळी किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे रागाच्या भरात एका मित्राने दुसºयाचा खून केला.मध्य रेल्वेचे उपनगरीय स्थानक असलेल्या शेलू गावात मोठ्या प्रमाणात बांधकाम साइट आहेत. दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग येथून आपल्या मूळ गावी परतला आहे. असे असताना कामे पुन्हा सुरू होतील म्हणून काही मजूर अजूनही थांबून आहेत. उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेले त्यातील मित्र म्हणून एकत्र राहणारे दोन मजूर हे रविवारी रात्री एकत्र बसले होते.

शेलू- बांधिवली रस्त्यावर असलेल्या माजी उपसरपंच गुरुनाथ मसणे यांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या व्हरांड्यात ब्रिजभान यादव (४४) आणि कपिल देव मुन्ना भारती उर्फ सिंघनिया हे एकत्र गप्पा मारत बसले होते. रात्री साडेअकराच्या सुमारास वादावादी झाली आणि त्यात ब्रिजभान यादव यांचा मृत्यू झाला. कपिलदेव मुन्ना भारती याने ब्रिजभानच्या डोक्यात मातीची वीट घातल्याने ब्रिजभान यांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी साडेसात वाजता या घटनेची माहिती शेलू पोलिसांना मिळाली.