शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

100 रुपयांच्या वादात हत्या करत आत्महत्येचा बनाव; मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 14:19 IST

राजू पाटील याची हत्या करण्यात आली आहे. पाटील आणि कोकाटेमध्ये गेल्या ८ वर्षँपासून मैत्री होती. मात्र, याच दरम्यान कोकाटेच्या मामे भावाकडून घेतलेले १०० रुपये न देता त्याला शिवीगाळ केल्याच्या रागात दोघांमध्ये वाद होऊ लागले.

मुंबई : मामे भावाचे १०० रुपये न देता त्याला शिवीगाळ केल्याच्या रागात मित्रानेच गॅरेजमधील दोरीने मित्राचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून पेटवून देत आत्महत्येचा बनाव केल्याचा प्रकार दहिसरमध्ये  समोर आला आहे. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी परमेश्वर कोकाटेला अटक केली.राजू पाटील याची हत्या करण्यात आली आहे. पाटील आणि कोकाटेमध्ये गेल्या ८ वर्षँपासून मैत्री होती. मात्र, याच दरम्यान कोकाटेच्या मामे भावाकडून घेतलेले १०० रुपये न देता त्याला शिवीगाळ केल्याच्या रागात दोघांमध्ये वाद होऊ लागले. ते दहिसर येथील एका गॅरेजमध्ये राहत होते. ४ फेब्रुवारी रात्रीसाडे आठच्या सुमारास सोबत दारू प्यायल्यानंतर याच १०० रुपयांवरून त्यांच्यात वाद झाले. कोकाटेने रागात त्याला खाली पाडले. गॅरेजमधील दोरीने त्याचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर, तेथील काही कपडे आणि ब्लकेटमध्ये त्याला गुंडाळून रात्री पेटवून दिले. थोड्या वेळाने आग लागली, असे ओरडत पाटीलने आत्महत्या केल्याचा बनाव केला. स्थानिकांच्या मदतीने आग विझवत याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. दहिसर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत, शोध सुरू केला.

असा झाला उलगडाब्लँकेटमध्ये स्वतःला गुंडाळून कोणी आत्महत्या कसे करू शकतो? यामुळे पोलिसांनी कोकाटेकडे उलटतपासणी सुरू केली. सुरुवातीला तो मी नव्हेच म्हणणाऱ्या कोकाटेने अखेर, गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी आरोपीला अटक करत त्याला ५ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याचे दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी