शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मौजमजेसाठी हवी होती मित्राच्या गळ्यातील सोनसाखळी; १४ वर्षीय मित्राची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 19:14 IST

Murder Case : हत्येप्रकरणी दोघे मित्र ताब्यात

ठळक मुद्देसोहम बजागे ( वय १४ वर्ष ) असे मृतक अल्पवीयन मुलाचे नाव आहे. तर अक्षय वाघमारे (वय २४ वर्ष ) आणि त्याचा अल्पवीयन साथीदार असे आरोपीचे नावे आहेत. 

नितिन पंडीत

भिवंडी - १४ वर्षीय मित्राला दोघा मित्रांनी बहाण्याने एका इमारतीच्या बंद फ्लॅटमध्ये नेले. त्यांनतर त्याच्या गळ्यातील सोनसाखळी काढण्याचा प्रयत्न केला असता, त्याने विरोध केल्याने त्या दोघांनी त्याची गळा आवळून हत्या केली असल्याची घटना भिवंडीतील बापगाव येथे बुधवारी घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच बंद फ्लॅटमधील एका सोफ्यामध्ये लपवून ठेवला होता. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोहम बजागे ( वय १४ वर्ष ) असे मृतक अल्पवीयन मुलाचे नाव आहे. तर अक्षय वाघमारे (वय २४ वर्ष ) आणि त्याचा अल्पवीयन साथीदार असे आरोपीचे नावे आहेत. 

मृतक सोहम हा कल्याण - पडघा मार्गावरील बापगाव येथील जय मल्हारनगर मधील साईराम रेसिडेन्सी येथील इमारतीत कुटूंबासह राहत होता. बुधवारी दुपारच्या सुमारास आरोपींनी मृतक सोहमला मोर दाखवण्याच्या बहाण्याने बोलवून त्याला तो राहत असलेल्या परिसरातील एका इमारती मधील बंद फ्लॅटमध्ये घेऊन गेले. त्यांनतर त्याच्या गळ्यातील सोनसाखळी खेचण्याचा प्रयत्न केला. त्यास मृतक सोहमने विरोध केला. त्यामुळे दोघा आरोपींनी त्याची गळा आळवून हत्या करून त्याच्या गळ्यातील दीड तोळ्यांची सोनसाखळी काढली. आणि त्याचा मृतदेह त्याच ठिकाणी एका सोफ्यात लपवून ठेवला. त्यांनतर दोघानीही मयत सोहम ची सोनसाखळी कल्याणातील एका सोनाराकडे १० हजार रुपयात गहाण ठेवून त्यामधून मिळालेल्या पैश्यातून आरोपीने उसने पैसे फेडणार होता तर उरलेल्या पैशातून मौजमजा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

             

दरम्यान बुधवारी दुपारपासून सोहम बेपत्ता असल्याची माहिती त्याच्या कुटूंबासह तो राहत असलेल्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे सायंकाळपासून त्याचा कुटूंबाने शोध घेतला. विशेष म्हणजे आपल्यावर संशय येऊन नये म्हणून या आरोपींनीही कुटूंबासोबत फिरून त्याचा  शोध घेत होते. अखेर रात्रीच्या सुमारास एका बंद फ्लॅटचा दरवाजा उघडून त्यामध्ये शोध घेतला असता, त्याचा मृतदेह सोफ्यामध्ये लपवून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनतर घटनेची माहिती पडघा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेऊन पंचनामा करून सोहमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला असून पडघा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. त्यावेळी नातेवाईकांने दिलेल्या माहिती व संशयातून सोहमच्या दोघमित्राना गुरुवारी ताब्यात घेतले आहे . 

            

सोहमच्या हत्येच्या ३ ते ४ दिवसापूर्वीही आरोपींनी त्याच्या गळ्यातील सोनसाखळी मधील लॉकेट विकून मौजमजा केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तर केवळ मौजमजा करण्यासाठी अल्पवयीन मित्राची हत्या करण्यात आल्याने परिसरात संतापाची लाट पसरली असून अधिक तपास पडघा पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhiwandiभिवंडीPoliceपोलिसArrestअटक