शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाला नकार दिल्याने प्रियकाराकडून प्रेयसीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 19:53 IST

बाणावलीतील घटना: दुसऱ्याबरोबर प्रेम करते म्हणून गळा आवळला

ठळक मुद्देमेलबर्न फर्नाडिस (22) या युवकाने आपली प्रेयसी जेनिफर गोन्सालविस (24) हिचा गळा आवळून खून करण्याची घटना रागाने मेलबर्नने प्रथम हाताने आपल्या प्रेयसीचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला नंतर आपला गंजीफ्रॉककडून त्याने तिचा गळा आवळला.

मडगाव:  प्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार दिल्याच्या कारणावरून बाणावली येथील मेलबर्न फर्नाडिस (22) या युवकाने आपली प्रेयसी जेनिफर गोन्सालविस (24) हिचा गळा आवळून खून करण्याची घटना शुक्रवारी दुपारी बाणावली मोती डोंगर या परिसरात घडली असून रात्री उशिरा हा युवक कोलवा पोलिसांना शरण आला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, बाणावली येथील मेलबर्न फेर्नांडिस या 24 वर्षीय युवकाचे मडगावातील जेनिफर गोन्सालविस  या युवतीशी प्रेमाचे बंधन जुळले होते. मागची 4 वर्षे त्यांचे प्रेम चालू होते. मेलबर्न एका तारांकित हॉटेलात काम करत होता . मात्र हल्लीच त्याला कामावरून कमी केल्याने तो बेकार होता. कोम्ब मडगाव येथे राहणारी जेनिफर मडगावात एका सरफाच्या दुकानावर सेल्सगर्ल म्हणून कामाला होती.

संशयिताने पोलिसांना दिलेल्या जबानीत आपल्या प्रेयसीची हल्लीच्या दिवसात आणखी एका मुलाकडे ओळख झाली होती. हा युवक जहाजावर काम करत होता. त्यामुळे ती त्याच्याकडे ओढली गेली होती. यामुळेच मेलबर्न दुखावला गेला होता. शुक्रवारी ती युवती त्या आपल्या नव्या दोस्ताशी बोलत असल्याचे पाहून मेलबर्नचे पित्त खवळले. त्याने तिला जवळच्याच मोती डोंगरावर बोलावून घेतले.  दुपारच्या 2 च्या सुमारास मोती डोंगरावरील पायऱ्या वर ती दोघे बसली असता मेलबर्नने आपल्या त्या प्रेयसीला त्या युवकाकडे असलेल्या संबंधावीशी विचारले असता तिनेही आपण त्या मुलाकडे लग्न करणार असे मेलबर्नला सांगितले. त्यामुळे रागाने मेलबर्नने प्रथम हाताने आपल्या प्रेयसीचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला नंतर आपला गंजीफ्रॉककडून त्याने तिचा गळा आवळला. त्यानंतर मृतदेह तिथेच टाकून तो आपल्या घरी आला. घरी सायंकाळी त्याने आपल्या घरच्यांना आपण केलेल्या कृत्याची माहिती दिल्यानंतर त्याला पोलिसांना शरण जाण्याचा सल्ला देण्यात आला. रात्री उशिरा कोलवा पोलिसांना तो शरण आला  नंतर त्याला अटक केली अशी माहिती दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिली. दक्षिण गोव्यातली दुसरी घटनाप्रेम संबंधाना नकार दिल्यामुळे आपल्या प्रेयसीचा खून करण्याची दक्षिण गोव्यातील मागच्या काही दिवसातील ही दुसरी घटना असून यापूर्वी बायथेखोल बोरी  येथे एका अल्पवयीन मुलीचा अशाच प्रकारे गळा आवळून खून केला होता. समाज सेविका आवदा व्हिएगस यांनी या अशा वाढत्या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त करताना या मुलांना कुणी नको म्हटलेले चालत नाही असे म्हटले आहे. मुलींनाही आपले निर्णय घेण्याचा अधिकार आहे ही बाब हे युवक मानायला तयार नाहीत. अजूनही मुलींकडे भोग वस्तू म्हणूनच पाहिले जाते अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :MurderखूनgoaगोवाPoliceपोलिसArrestअटक