शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातून गर्लफ्रेंडची हत्या, २० पेक्षा अधिक दिवस मृतदेह होता घरात पडून  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 22:10 IST

Murder : आपल्याला फसवत असल्याच्या त्याला संशय होता. याच संशयातून तिचा गळा आवळून हत्या करून घराला बाहेरून कुलूप लावून पळ काढला होता.

ठळक मुद्देरोडपली येथील गावठाण भागात भाडोत्री राहणाऱ्या लीपी सागर शेख (२६) या महिलेचा मृतदेह आढळून आला होता.

नवी मुंबई : अनैतिक संबंधातून बांग्लादेशी महिलेच्या हत्ये प्रकरणी कळंबोली पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हत्येनंतर सुमारे २० हुन अधिक दिवस मृतदेह घरात पडून होता. मात्र  दोन मैत्रिणी त्याठिकाणी रहायला आल्या असता प्रकार उघडकीस आला.रोडपली येथील गावठाण भागात भाडोत्री राहणाऱ्या लीपी सागर शेख (२६) या महिलेचा मृतदेह आढळून आला होता. ती ज्याठिकाणी राहायची त्याच ठिकाणी इतर दोन महिला तिच्यासोबत राहायच्या. मात्र लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने त्या दोन्ही महिला बांग्लादेशला निघून गेल्या होत्या. ६ तारखेला त्या पुन्हा आल्या असता घराला बाहेरून कुलूप होते. यामुळे त्यांनी घर मालकाला कळवून कुलूप तोडले असता आतमध्ये लीपी शेख हिचा मृतदेह आढळून आला. मृतदेह पुर्नपणे कुजलेल्या अवस्थेत होता. याप्रकरणी कळंबोली पोलिसठाण्यात गुन्हा दाखल होताच वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी पोलीस निरीक्षक दिलीप गुजर, सहायक निरीक्षक ऋषिकेश घाडगे, नितीन कुंभार, मनेश बच्छाव, अर्चना गाढवे, कृष्णांत माळी, संजय भोरे आदींचे पथक केले होते. त्यांनी परिसरात सखोल चौकशी केली असता, काही दिवसांपासून तिच्यासोबत एक तरुण राहत होता अशी माहिती समोर आली. मात्र त्याच्याविषयी कोणाला माहिती नव्हती. अखेर कौशल्यपूर्ण व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी मोहम्मद अली मुदस्सर शेख (२४) याला मुंब्रा येथून अटक केली. तो देखील मूळचा बांग्लादेशी असून विवाहित आहे. लीपी शेख हि महिला पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर मोहम्मद याच्या संपर्कात आली होती. त्यामुळे काही महिन्यांपासून दोघे एकत्र राहत होते. मात्र यादरम्यान ती पुन्हा पहिल्या पतीच्या संपर्कात असल्याची चाहूल मोहम्मद याला लागली होती. यावरून ती आपल्याला फसवत असल्याच्या त्याला संशय होता. याच संशयातून तिचा गळा आवळून हत्या करून घराला बाहेरून कुलूप लावून पळ काढला होता. 

टॅग्स :MurderखूनNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिसArrestअटक