शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय वर्चस्वाच्या स्पर्धेतून दीपक मारटकर यांचा खून; आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2020 20:17 IST

अश्विनी कांबळे व महेंद्र सराफ यांचे दीपक मारटकर यांच्याशी राजकीय वैमनस्य होते.

पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीची तयारी आतापासून सुरु झाली आहे. त्यामुळेच राजकीय वर्चस्वाच्या स्पर्धेतून शिवसेनेचे विभाग प्रमुख दीपक मारटकर यांचा कट रचून खून केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या तिघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. बाफना-भळगट यांनी ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.         अश्विनी सोपान कांबळे (वय २५, रा. बुधवार पेठ), महेंद्र मदनलाल सराफ (वय ५७, रा.बुधवार पेठ) आणि निरंजन सागर म्हंकाळे (वय १९, रा. गवळी वाडा, बुधवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.         शुक्रवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठेतील गवळी आळीसमोर टोळक्याने दीपक मारटकर यांच्यावर वार करुन त्यांचा खून केला. या प्रकरणात सनी कोलते, संदीप ऊर्फ मुंगळ्या कोलते (रा. सुखसागरनगर), रोहित ऊर्फ बाळा कांबळे, राहुल ऊर्फ पांड्या रागीर (रा. लोहियानगर), लखन ऊर्फ आण्णा धावर (रा. पंढरपूर) आणि रोहित क्षीरसागर (रा. गंज पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अटक केलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर केले. निरंजन हा मारटकर यांच्या शेजारी राहण्यास असून त्याने दीपक यांची प्रत्येक हालचालीची माहिती आरोपींना पुरविली. फरार आरोपीबरोबर घटना घडण्यापूर्वी निरंजन असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरुन दिसून येते. 

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, अश्विनी व महेंद्र यांचे मारटकर यांच्याशी राजकीय वैमनस्य होते. त्यांच्यात आणखी काही वाद होता का याचा तपास करायचा असल्याचे सहायक सरकारी वकील सुरेखा क्षीरसागर यांनी सांगितले. न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी मंजूर केली.महेंद्र सराफ आणि विजय मारटकर हे दोघेही शिवसेनेत होते. त्यांचे १९९८ पासून राजकीय वैमनस्य होते. मागील महापालिका निवडणुकीत अश्विनी कांबळे व मारटकर हे परस्परविरोधात उभे होते. सध्या कोरोनाच्या काळात दीपक मारटकर यांनी आपला जनसंपर्क वाढविला होता. परिसरातील वर्चस्वातून दीपकचा काटा काढण्यासाठी आरोपींनी कट रचला असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरु आहे. 

टॅग्स :PuneपुणेMurderखूनPoliceपोलिसCourtन्यायालयArrestअटक