शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Instagram वरील ओळख जीवावर बेतली; एकच मुलगी करत होती दोघांना डेट, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 14:45 IST

अरमानने तरुणीसोबत गैरवर्तन केले होते. त्याने मुलीचा मोबाईलही हिसकावून घेतला

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील गोकलपुरी परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका १८ वर्षीय मुलाने इंस्टाग्रामवर एका मुलीशी बोलल्यामुळे २० वर्षीय तरुणाचा भोसकून खून केला. पोलिसांनी आरोपी अमरानला अटक केली आहे. अमरान एका मुलीशी बोलत असे त्याच मुलीसोबत माहिर नावाचा मुलगाही बोलत असायचा.

मिळालेल्या माहितीनुसार, अरमान आणि माहिर दोघेही एकाच मुलीला डेट करत होते. या मुलीशी त्या दोघांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. मात्र, या इंस्टाग्राम रोमान्सचे लवकरच मोठ्या गुन्ह्यात रूपांतर झाले आणि अनेकांचे आयुष्य बदलले. मुलीने माहिरशी बोलू नये असे अरमानला वाटत होते. यावरून दोघांमध्ये भांडण झाले. एकदा अरमानने व्हिडिओ कॉलदरम्यान माहिरला शिवीगाळही केली होती. मुलगी माहिरची बाजू घेतल्याचे आरोपीला वाटत होते. 

अरमानने तरुणीसोबत गैरवर्तन केले होते. त्याने मुलीचा मोबाईलही हिसकावून घेतला. माहिरसोबत सुरू झालेला हा वाद अरमानच्या मनात घर करून बसला आणि त्याने माहिरसोबत बदला घेण्याचे ठरवले. मुलीचा फोन परत करण्याच्या बहाण्याने त्याने माहिरशी संपर्क साधला. माहिर फोन परत घेण्यासाठी गेला असता अरमानने त्याच्यावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली. अरमानला मित्र फैसल, मोहम्मद समीर यांच्यानंतर मुलीच्या सांगण्यावरून पुराव्याच्या आधारे अटक करण्यात आली आहे. 

माहिरचा मृतदेह भागीरथी विहारच्या रस्त्याशेजारी सापडला. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. त्यानंतर गुन्हा दाखल करत आरोपी अरमानला बेड्या ठोकल्या. सुरुवातीच्या तपासात माहिरच्या शरीरावर चाकूने वार केल्याच्या खूना आढळल्या. पोलिसांनी घटनास्थळावरून चाकू जप्त केला. मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला. तपासात पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मृत मुलाचे कॉल डिटेल्स काढले. त्यात अरमानचा नंबर पुढे आला. अरमान आणि माहिर दोघेही एकाच मुलीसोबत बोलायचे. तपासात मुलीचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर आरोपींचे लोकेशन ट्रेस करून तिघांना अटक केली. सध्या पोलीस या घटनेचा आणखी तपास करत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी