शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

Murder Case : सुरक्षारक्षकाच्या हत्येचा आठ तासात छडा; तिघांपैकी एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 16:50 IST

Murder Case : चोरीचा माल खरेदी करणाऱ्या भंगारवाल्यालाही बेडया

डोंबिवली: पूर्वेकडील एमआयडीसी फेज १ मधील विजय पेपर मिल मधील सुरक्षारक्षक ग्यानबहादुर भिमबहादुर गुरूम याची चोरीच्या उद्देशाने हत्या करणा-या तिघा आरोपींपैकी एकाला  अटक करण्यात मानपाडा पोलिसांना यश आले. विशेष बाब म्हणजे आरोपींमध्ये रिक्षाचालकाचा समावेश असून त्याच्यासह चोरीचे भंगार सामान खरेदी करणा-या भंगारवाल्याला बेडया ठोकण्यात आल्या आहेत. गुन्हयात वापरण्यात आलेल्या रिक्षावर असलेल्या बॅनरवरून या हत्येचा आठ तासात छडा लावण्यात आला आहे.

बुधवारी सकाळी सुरक्षारक्षक ग्यानबहादुरचा मृतदेह मिल बाहेर रक्ताच्या थारोळयात आढळला होता. या गुन्हयाच्या तपासकामी सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे, मानपाडा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक बाळासाहेब पवार, अनिल पडवळ, सहाय्यक पोलिस निरिक्षक अविनाश वनवे, अनिल भिसे, सुरेश डांबरे, सुनिल तारमळे आदिंची पथके गठीत केली होती. मिल लगतच्या परिसरातील  सीसीटिव्ही कॅमेरे तपासले असता मिलमध्ये तिघांनी प्रवेश केल्याचे आणि भंगार चोरी केल्यावर ते रिक्षातून गेल्याचे दिसले. त्या रिक्षाच्या मागे चिकटवलेले पोस्टर कापलेल्या अवस्थेत होते. त्या पोस्टरच्या आधारे तपासाची चक्रे फिरविण्यात आली. पोलिस पथकातील पोलिस नाईक प्रशांत वानखेडे आणि पोलिस शिपाई संतोष वायकर यांना गस्ती दरम्यान पोस्टर कापलेल्या अवस्थेतील रिक्षा निदर्शनास पडली असता त्यांनी ती अडवली. परंतू रिक्षाचालक न थांबता पळून जाऊ लागला असता त्याला दोघांनी पाठलाग करून पकडले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने दोन साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. टोनी थॉमस डिसिल्व्हा उर्फ शिवा सोमा हिलम (वय ३०) असे अटक रिक्षाचालकाचे नाव असून तो हत्येच्या गुन्हयातील प्रमुख आरोपी आहे. चोरी केलेले भंगाराचे सामान खरेदी करणारा भंगारवाला फिरोज इस्माईल खान (वय ३०) यालाही पोलिसांनी अटक केली. गुन्हयात वापरलेली रिक्षाही जप्त करण्यात आली आहे. गुन्हयातील आणखीन दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक बागडे यांनी सांगितले.दिवसा रिक्षाचा धंदा; रात्री चोरीटोनी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधीचे चार गुन्हे दाखल आहेत. तो दिवसा भाडयाने रिक्षा चालवायचा आणि रात्री साथीदारांच्या मदतीने चो-या करायच्या असेही तपासात उघड झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdombivaliडोंबिवलीPoliceपोलिसArrestअटक