शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं काढला पतीचा काटा; पोलिसांनी शर्टावरील 'टेलर मार्क'वरुन लावला हत्येचा छडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 18:38 IST

मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी चेहरा विद्रुप केला परंतु चाणाक्ष पोलिसांनी मृतदेहाचा अंगातील शर्टा वरून मृतदेहाची ओळख पटवीत हत्या करणाऱ्या पत्नी सह प्रियकराच्या मुसक्या अवळल्या आहेत.

नितिन पंडीत

भिवंडी ( दि. ८ ) चार मुलांच्या आईने आपल्या प्रियकर सोबतच्या प्रेमात पतीचा अडथळा ठरत असल्याने गावठी औषध घेण्याच्या उद्देशाने आडवाटेच्या जंगलात नेऊन त्याची हत्या करून मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी चेहरा विद्रुप केला परंतु चाणाक्ष पोलिसांनी मृतदेहाचा अंगातील शर्टा वरून मृतदेहाची ओळख पटवीत हत्या करणाऱ्या पत्नी सह प्रियकराच्या मुसक्या अवळल्या आहेत. सलाउद्दीन मोहम्मद युसूफ ( वय ४२ )  विठ्ठल नगर असे हत्या केलेल्या दुर्दैवी पतीचे नाव आहे.

भिवंडी तालुका पोलीस ठाणे हद्दीत ४ जानेवारी रोजी खारबाव रेल्वे स्टेशन परिसरातील जंगलात एक व्यक्तीचा मृतदेह गळा चिरलेल्या चेहरा विद्रुप केलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकाच खळबळ उडाली होती . घटनेचे गांभीर्य पाहता मृतदेहाची ओळख पाठविण्याचे मोठे आव्हान पोलिसां समोर असताना गणेशपुरी विभाग पोलिस उपअधीक्षक विकास नाईक यांनी तपासाची सूत्रे आपल्या हाती घेत मृतदेहाच्या शर्टावरील आयान फॉर मेन्स टेलर्स हा मार्कां आढळून आला असता पोलिसांनी भिवंडीत या नावाने टेलर्स दुकानाचा शोध घेतला. 

हा टेलर बागे फिरदोस येथे सदर दुकान आढळून आले असता त्याच्या मदतीने शर्टाची व त्यानंतर मृतदेहाची ओळख पाटविण्यात आली असता तो मृतदेह सलाउद्दीन मोहम्मद युसूफचा असल्याचे निष्पन्न झाले असता तेथे जाऊन पोलिसांनी मृतदेहाच्या कुटुंबियांचा शोध घेत मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी स्थानिकांना कडून माहिती घेतली असता त्याच इमारती मधील असजद अन्सारी ही  व्यक्ती दफनविधी प्रसंगी नव्हता ही बाब समोर आली. त्यांनतर पोलिसांची संशयाची सुई त्याच्या कडे वळली असता त्याचा शोध घेतला असता तो पसार झाला होता. त्यांनतर नारपोली परिसरातून त्यास ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली .

असजद अन्सारी ( वय ३२ ) हा विवाहित असून त्याचे  मयत सालाउद्दीनच्या ३८ वर्षीय पत्नी सोबत मागील सहा महिन्यां पासून अनैतिक संबंध होते.त्यामध्ये पतीचा अडसर ठरत असल्याने पत्नी व प्रियकराने मिळून कट रचला असल्याचे तपासात समोर आले. 

मयत सालाउद्दीन यास लघवीचा त्रास होत असल्याने भिवंडीतील खारबाव येथील ग्रामीण भागात त्यावर गावठी औषध मिळते ते घेण्यासाठी त्यास पत्नीने गळ घातली व त्यासाठी दोघे गेले असता त्या ठिकाणी आधीच येऊन थांबलेल्या प्रियकराने धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करीत मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी तोंडावर दगड आपटून चेहरा विद्रुप केला होता. परंतु भिवंडी तालुका पोलिसांनी पोलीस उपअधीक्षक विकास नाईक यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या दोन दिवसात आरोपी पत्नी व प्रियकरास अटक केली असून न्यायालयाने दोघा आरोपींना १४ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे .

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhiwandiभिवंडी