शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या नशेत किरकोळ कारणावरून वाद,२५ वर्षीय तरुणाचा खून ; राजगुरूनगर येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 16:38 IST

आरोपींनी अपघाताचा बनाव करुन मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने खेड घाटात टाकला.

राजगुरूनगर:  किरकोळ कारणावरुन वाद होऊन दारूच्या नशेत २५ वर्षीय युवकाचा खून झाला आहे.आरोपींनी अपघाताचा बनाव करुन पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह खेड घाटात टाकला. मयुर सुरेश एरंडे (वय २५, रा. थुगाव ता.आंबेगाव) असे खून झालेल्या युवकाचे नाव असुन खेडपोलिसांनी चार आरोपीना अटक केली आहे. याबाबत मयत मयुरचे वडील सुरेश लक्ष्मण एरंडे ( वय ४७, रा. थुगाव ता.आंबेगाव ) यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या खूनप्रकरणी पोलिसांनी गुल्या उर्फ आदित्य नवले, साहील अंबादास सुरवसे, गणेश वाबळे, सोन्या उर्फ आनंद सुधीर नाटे (सर्व रा. मंचर ता.आंबेगाव ) या आरोपींना अटक केली आहे. 

पुणे - नाशिक महामार्गावर मंगळवारी (दि. ६ ) रोजी खेडघाटात रस्त्याच्या कडेला मोटार सायकल व एका अज्ञात युवकाचा मृतदेह पडला असल्याची माहिती खेड पोलिसांना मिळाली. आधी हा अपघात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, खेड पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून युवकाच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने गंभीर जखम केली असल्याचे आढळून आले. तसेच युवकाच्या शरीरावर इतर कुठेही मारहाण नसल्याचे व मोटार सायकलचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, मृतदेहाच्या खिश्यात ओळखपत्र मिळाल्यांने पोलिसांनी तपासांची चक्रे फिरली. या युवकाचा हा खून असल्याचे लक्षात आले. 

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुल्या उर्फ आदित्य नवले यांचे मंचर येथे मोबाईल शॉपीचे दुकान आहे. या दुकांनात मयत मयुर कामास होता. मंगळवारी रात्री साडेसात वाजता गुल्या उर्फ आदित्य नवले, साहील अंबादास सुरवसे, गणेश वाबळे,सोन्या उर्फ आनंद सुधीर नाटे (सर्व रा. मंचर ता.आंबेगाव ) यांच्याबरोबर मयुर हा मंचर शहराच्या हद्दीत क्रीडा संकुल येथे दारू पिण्यास गेले होते. दारूच्या नशेत वादावादी होऊन मयुरच्या डोक्यात लाकडी खोऱ्याने मारून एरंडे यांचा खून केला.

या घटनेचा अधिक तपास खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतीश गुरव याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक राहूल लाड करत आहे.

टॅग्स :KhedखेडPoliceपोलिसMurderखूनArrestअटक