भोपाळ - मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातून नात्याला काळिमा फासणारी खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने क्रुरपणे पत्नी आणि मुलीची हत्या केली. इतक्यावरच न थांबता त्याने दोघींचे मृतदेहाचे तुकडे तुकडे करून एका गोणीत भरले. छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह 24 तास एका खोलीत ठेवले. ही थरारक घटना रीवा मुख्यालयापासून 70 किमी दूर मऊगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.आरोपीच्या पहिल्या पत्नीने आत्महत्या केली होती. यानंतर त्याने विधवा वहिनी प्रमिलासोबत दुसरं लग्न केलं. दोघांना 1 वर्षांची काजल नावाची मुलगी देखील होती. छिंदलाल साकेत याने हत्या केल्यानंतरही कोणालाही संशय येऊ नये म्हणून तो सर्वसामान्यपणे वागत होता. आरोपी गुरुवारी रात्री अंधारात गोणी फेकण्याच्या तयारीत होता. त्यादरम्यान गावकऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडले आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली.मृत महिलेच्या मुलाने सांगितले की, वडील दारू आणि अंडी घेऊन आले होते. दारू प्यायले आणि त्यानंतर आम्हाला घराबाहेर काढलं. एसपी रीवा राकेश कुमार सिंह यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात या हत्येमागे मोठा कट असल्याची शक्यता आहे. आरोपीच्या पहिल्या पत्नीची आत्महत्यादेखील संशयाच्या फेऱ्यात आहे. आरोपीच्या मोठ्या भावाचाही मृत्यू झाला आहे आणि भावाच्या मृत्यूनंतर त्याने वहिनीशी लग्न केलं आहे, अशी माहिती न्यूज १८ लोकमतने दिली आहे.
पत्नीसह चिमुकल्या मुलीची केली हत्या, मृतदेहाचे तुकडे - तुकडे करून भरले गोणीत अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 21:31 IST
Double Murder : गावकऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडले आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली.
पत्नीसह चिमुकल्या मुलीची केली हत्या, मृतदेहाचे तुकडे - तुकडे करून भरले गोणीत अन्...
ठळक मुद्देही थरारक घटना रीवा मुख्यालयापासून 70 किमी दूर मऊगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.