शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

सांगलीत सव्वा लाखांची लाच घेताना महापालिकेचा अग्निशमन अधिकारी जाळ्यात

By शरद जाधव | Updated: June 27, 2023 21:27 IST

‘लाचलुचपत’ची कारवाई; दाखला देण्यासाठी मागितली लाच

सांगली : फायरफायटिंग सिस्टीम बसविल्याच्या कामाचा अंतिम दाखला देण्याच्या मोबदल्यात एक लाख २५ हजार रुपयांची लाच स्विकारताना महापालिकेच्या प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यास रंगेहात पकडण्यात आले. विजय आनंदराव पवार (वय ५०, रा. संभाजीनगर, त्रिमुर्ती कॉलनी, सांगली) असे संशयिताचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टिंबर एरिया येथील अग्नीशमन विभागाच्या कार्यालयात मंगळवारी सापळा लावून ही कारवाई केली.

तक्रारदाराच्या कंपनीकडून फायरफायटिंग सिस्टीम बसविण्याची कामे केली जातात. अशाच एका कामाचा अंतिम दाखला देण्याच्या मोबदल्यात पवार याने दिड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. पैसे न दिल्यास कंपनीकडून करण्यात येणाऱ्या पुढील कामाची दाखले देणार नाही असेही पवार याने सांगितले होते. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. पवार याने दिड लाख रुपयांची मागणी करत तडजोडीअंती सव्वा लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते.

मंगळवारी टिंबर एरिया येथील अग्नीशमन व आणीबाणी सेवा विभाग कार्यालयात सापळा लावून लाचेची सव्वा लाखांची रक्कम स्विकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.‘लाचलुचपत’चे उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, अजित पाटील, उमेश जाधव, अतुल मोरे, रविंद्र धुमाळ आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कोणत्याही शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्याने कामासाठी पैशाची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. याबाबत तक्रार आल्यानंतर पडताळणी करून त्यावर कारवाई करण्यात येईल, असे उपअधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागSangliसांगली