शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

मुंबईच्या हाई प्रोफाइल ऑर्केस्ट्रा गर्लला अटक, चोरी करून बनली करोडपती 

By पूनम अपराज | Updated: December 21, 2020 20:40 IST

Crime News : वरिष्ठ निरीक्षक जगदीश साईल आणि योगेश चव्हाण यांच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी तिला बंगळुरू येथून अटक केली.

ठळक मुद्देआतापर्यंत तिच्याविरूद्ध देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये ९ गुन्हे दाखल झाले आहेत. सर्व घटनांमध्ये तिने १० ते २० लाख रुपयांची चोरी केली आहे.

४६ वर्षीय मुनमुन हुसेन उर्फ अर्चना बरुआ उर्फ निक्की ही पेशाने एक ऑर्केस्ट्रा गर्ल आहे, परंतु तिच्या कमाईचा खरा स्त्रोत चोरी आहे. या चोरीच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत ती कोट्याधीश झाली. वरिष्ठ निरीक्षक जगदीश साईल आणि योगेश चव्हाण यांच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी तिला बंगळुरू येथून अटक केली.ज्या प्रकरणात तिला पकडले गेले आहे ती लोअर परळच्या फिनिक्स मॉलशी संबंधित आहे. सुमारे दीड वर्षापूर्वी एका महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्या महिलेच्या कुटुंबात लग्न होते. तिने बॅंकेच्या लॉकरमधून सुमारे १३ लाखांची दागिने आणले आणि बॅगमध्ये ठेवली. बॅगमध्ये काही रोकडही होती. त्या महिलेला फिनिक्स मॉलमध्ये काही कपडे विकत घ्यावे लागले. त्यामुळे तिने ती बॅग काही काळ आपल्या मुलाकडे दिली. मुलाला कोणाचा तरी फोन आला. त्याने ती बॅग खाली ठेवली आणि बोलण्यात मग्न झाला. त्याचवेळी मुनमुनने ती बॅग उचलली आणि ती तिथून गायब झाली.

९ गुन्हे दाखल

या घटनेच्या काही दिवस आधी दादरच्या शिवाजी पार्क येथे याच मोडस ऑपरेंडीप्रमाणे चोरी झाली होती. क्राइम ब्रँचने दोन्ही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले तेव्हा दोन्ही ठिकाणी तीच महिला दिसली. तेव्हापासून पोलीस तपास करत होता. दोन दिवसांपूर्वी मुनमुनला बंगळुरूमध्ये असल्याची माहिती मिळाली, तेथूनच तिचा शोध लागला. आतापर्यंत तिच्याविरूद्ध देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये ९ गुन्हे दाखल झाले आहेत. सर्व घटनांमध्ये तिने १० ते २० लाख रुपयांची चोरी केली आहे.दागदागिने अशा प्रकारे ठेवत होती तारण 

 तिच्या घरात असलेल्या एकाला कर्करोग झाला असून त्याला उपचारासाठी रोख रकमेची गरज असल्याचे बतावणी करून ती चोरी केलेले दागिने तारण ठेवत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ती मूळची कोलकाताची आहे. ती खूप छान गाते. काही काळ तिने मुंबईत काम शोधले. नंतर ती बंगळुरूमधील एका ऑर्केस्ट्रा ग्रुपमध्ये सामील झाली आणि तेथील बारमध्ये काम करू लागली. ती चोरीसाठी फ्लाईटवर येत होती

टॅग्स :ArrestअटकMumbaiमुंबईPoliceपोलिसRobberyचोरी