शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
3
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
4
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
6
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
7
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
8
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
9
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
10
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
11
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
12
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
13
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
14
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
15
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
16
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
17
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
18
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
19
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
20
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग

26/11 Terror Attack : आजच्या दिवशी मुंबई हादरली होती; तपास अधिकारी रमेश महाले यांनी उलगडला ‘त्या’ सात मिनिटांचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 15:57 IST

26/11 Terror Attack : तोपर्यंत पोलिसांनी कसाबला काठीने मारण्यास सुरुवात केली होती. अवघ्या ७ मिनिटांच्या या थरारानंतर कसाबला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले, असे महाले यांनी सांगितले.

नौदल, तटरक्षक दल आणि पोलीस गस्ती नौका असे तिहेरी सुरक्षा यंत्रणांचे कवच भेदून ३ दिवसांचा धोका पत्करत त्या दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबई गाठली आणि २६/११ ची ती काळरात्र सर्वांच्याच काळजात धडकी भरवून गेली. ९ अतिरेक्यांचा खात्मा करून अतिरेकी अजमल कसाब याला जिवंत पकडताना १८ पोलीस हुतात्मा झाले. तब्बल १६६ निष्पापांना प्राणाला मुकावे लागले, तर ३०४ जण जखमी झाले. या घटनेला १३ वर्षे उलटली तरी जखमा आजही ताज्या आहेत. याच गुन्ह्याचा तपास आणि अतिरेक्यांपैकी एकमेव जिवंत हाती लागलेल्या कसाबला फासावर चढविण्यापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तपास अधिकारी रमेश महाले यांच्याशी केलेली ही खास बातचीत.हल्ल्याचा कॉल येताच वरिष्ठांच्या सूचनेनुसार पथकासह नरिमन पॉइंट येथे तैनात होतो. हातात असलेल्या वॉकीटॉकीवरून मिनिटामिनिटाला अतिरेक्यांच्या हालचालीचे अलर्ट येत होते. मारियासाहेब नियंत्रण कक्षात बसले होते. त्यांनी दोन्ही अतिरेक्यांना डोळ्याला बांधून नायर रुग्णालयात नेण्यास सांगितले. तेथे गेल्यानंतर इस्माईलला मृत घोषित करण्यात आले. तर कसाब जिवंत असल्याचे समजले. त्या दिवशी कसाबसोबत पहिली भेट झाली आणि कसाबचा तपास हाती आला. यामध्ये १२ गुन्हे दाखल झाले. त्यात ११ गुन्ह्यांचा तपास आम्ही केला. सीएसएमटीवर झालेल्या हल्ल्याचा तपास २ महिने एटीएसकडे होता. त्यानंतर तोही आमच्याकडे देण्यात आला.

२६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्ट जाहीर झाला. विधान भवनाकडून रायफलच्या धाकावर चोरलेली स्कोडा कार घेऊन अतिरेकी मलबार हिलच्या दिशेने निघाल्याचा पहिला कॉल रात्री १२ वाजून ११ मिनिटांनी खणाणला. आम्ही वॉकीटॉकीवर सज्ज होतो. साडेबाराच्या ठोक्याला ही कार गिरगाव चौपाटीकडे अडवण्यात आली. बाहेरील लाइट बंद करून आतील लाइट सुरू करण्याच्या आम्ही सूचना दिल्या. मात्र इस्माईलने अप्पर लाइट मारली. तो प्रकाश डोळ्यावर आल्याने पोलिसांना नंबर दिसत नव्हता. पोलीस गाडीभोवती येत असल्याचे पाहून इस्माईलने ती वळविण्याचा प्रयत्न केला. गाडी दुभाजकाला धडकून कारचे चाक जाम झाले. रागाच्या भरात इस्माईलने पोलिसांवर गोळ्या झाडल्या. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात इस्माईलचा मृत्यू झाला. ही बाब बाहेरच्या पोलिसांना माहिती नव्हती.

माझा पार्टनर मारला गेला या रागात त्या गाडीत बसलेला कसाब बाहेर आला आणि पायात पाय अडकून पडला. त्याचवेळी तुकाराम ओंबळेसाहेबांनी कसाबला एके-४७ सह पाहिले आणि पकडण्यासाठी मिठी मारली. कसाब त्यांना ढकलत होता, परंतु त्यांची मगरमिठी सुटायला तयार नव्हती. म्हणून त्याने ५ राउंड फायर केले. पाचही राउंड ओंबळे यांच्या पोटाच्या आरपार गेले. ४ राउंड मानेच्या बाजूने बाहेर आणि एक राउंड हाडाला लागून खिशात असलेल्या २ रुपयांच्या नाण्याला जाऊन भिडला. त्या नाण्याचा आकार सी राउंडसारखा झाला होता. ते नाणेही न्यायालयात सादर केले. आमचा संजय गोविलकर पुढे सरसावताच कसाबने आणखी एक राउंड फायर केला. तोपर्यंत पोलिसांनी कसाबला काठीने मारण्यास सुरुवात केली होती. अवघ्या ७ मिनिटांच्या या थरारानंतर कसाबला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले, असे महाले यांनी सांगितले.तपासातील आव्हानांना कसे तोंड दिले?पाकिस्तानमध्ये रचलेला कट आहे, हे कसाबच्या प्राथमिक चौकशीत समोर आले. पाकिस्तान अशा गुन्ह्यांची कधीच कबुली देत नाही, त्यामुळे हा हल्ला त्यांनीच केला, हे ज्याला मृत्यूची भीती नाही अशा कसाबकडून वदवणे आव्हानात्मक होते. ८१ दिवस त्याच्याकडे तपास केला. यादरम्यान विविध अफवांनी डोके वर काढले होते.तपासादरम्यान आठवणीतले शब्द कोणते?कसाबचा तपास हाती येताच सुरुवातीला तो दिशाभूल करत होता. जेव्हा बोलू लागला तेव्हा ‘साहब ८ बरस हो गये.. अफजल गुरू को फांसी नही दे सके. अभीसे गिनती शुरू करो. हिंदुस्तान मे फांसी नही दे सकते,’ असे तो म्हणाला. मात्र, त्याचे शब्द खोडून काढत चार वर्षाला ७ दिवस असताना त्याला फासावर लटकविले. त्या वेळी ‘साहब, तुम जिते मैं हारा...’ असे तो म्हणाला. ते शब्द कायम स्मरणात राहतील.अमेरिकेतून घेतला ५० ठिकाणांचा आढावाडेव्हिड हेडलीने लोकेशनसाठी कराची ते बधवार पार्क जीपीएसद्वारे प्रवास केला. यात ५० ठिकाणांचा समावेश होता. हेडलीने सर्व रेकी केली. त्यासाठी ताज, ओबेरॉयमध्ये राहिला. नरिमन हाउसमध्ये गेला. लोकल बोट करून तो ३ दिवस समुद्रात फिरला. याच जीपीएसद्वारे कसाबने मुंबई गाठली. अमेरिकेतून या ५० ठिकाणांचा आढावाही घेण्यात आला आहे.

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाMumbaiमुंबईPoliceपोलिस