शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सलमान खानच्या धमकी पत्रप्रकरणी मुंबई पोलिसांचे पथक दिल्लीत दाखल, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची करणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 18:04 IST

Salman Khan : आज सलमान खानच्या धमकी पत्र प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे एक पथक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या चौकशीसाठी दिल्लीत दाखल झाले आहे.

बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना मिळालेल्या धमकीच्या पत्राच्या प्रकरणात संशयाची सुई गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडे वळली आहे. अभिनेता सलमान खानला दिलेल्या धमकीच्या पत्रासंदर्भात दिल्लीपोलिसांनी तपासाचा फास आवळला असून सोमवारी तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली गेली. त्यावेळी दिल्ली पोलिसांना लॉरेन्स बिश्नोई म्हणाला की, या प्रकरणात त्याचा काहीही हात नाही आणि ते पत्र कोणी लिहिले हे देखील मला माहीत नाही. मात्र, आज सलमान खानच्या धमकी पत्र प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे एक पथक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या चौकशीसाठी दिल्लीत दाखल झाले आहे.

मुंबई पोलिसांनी सोमवारी बॉलीवूड अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांचा जबाब नोंदवला. त्यांना एक दिवस आधी पत्र मिळाले होते. त्यात पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्याप्रमाणेच पिता-पुत्र दोघांनाही सामोरे जावे लागेल असं नमूद होतं. दिल्ली पोलिसांनी सलीम यांना मिळालेल्या पत्राबाबत बिश्नोईकडे चौकशी केली. तेव्हा यामध्ये त्याचा सहभाग नसून ते कोणी पाठवले याबाबतही काहीच माहीत नसल्याने उत्तर दिले. त्यामुळे हे पत्र अन्य कोणत्या टोळीकडून पाठविण्यात आले आहे की हा निव्वळ खोडसाळपणा आहे, या अनुषंगाने मुंबई पोलीस तसेच गुन्हे शाखा तपास करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास २०० ते २५० सीसीटीव्ही फूटेजची पडताळणी अद्याप करण्यात आली आहे. मात्र सलीम यांना चिठ्ठी मिळाली त्या परिसरात कोणीही आल्याचे किंवा गेल्याचे दिसत नाही. याप्रकरणी अद्याप ४० हून अधिक लोकांची चौकशीही पोलिसांनी केली. मात्र त्यांच्याकडूनही काहीच माहिती मिळालेली नाही. 

सलमान खानला धमकी देण्यात लॉरेन्स बिश्नोईचा हात? दिल्ली पोलिसांसमोर गँगस्टर म्हणाला...

तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सलीम वांद्रे येथील बॅन्डस्टॅन्ड प्रॉमिनेड गार्डनमध्ये असलेल्या नेहमीच्या बेंचवर जाऊन बसले. ते त्या ठिकाणाहून निघत असताना तिथे सफाई काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने बेंचखाली पडलेला कागदाचा कपटा उचलून त्यांचे सुरक्षारक्षक श्रीकांत हेगिष्टे यांच्या हातात दिला. यावरून घटनास्थळी त्या तिघांव्यतिरिक्त तिथे कोणीच नव्हते, असे स्पष्ट होते.

धमकीचा फोन आला नाही

मुंबई पोलिसांनी सोमवारी सलमानचादेखील जबाब नोंदविला. त्यावेळी मला कोणताही धमकीचा फोन आला नसल्याचे त्याने पोलिसाना सांगितले. चौकशीनंतर तो चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हैदराबादला निघून गेला.

टॅग्स :Salman Khanसलमान खानPoliceपोलिसMumbaiमुंबईdelhiदिल्ली