शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

अनंत चतुर्दशीसाठी मुंबई पोलीस सज्ज, ३५ हजार पोलिसांचा फ़ौजफाटा तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 19:43 IST

शहरातील सर्व पोलीस ठाण्यांतील  अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हद्दीत येणाऱ्या संवेदनशिल ठिकाणे, विर्सजन पॉईंटवर विशेष बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देशहरात बसविण्यात आलेल्या सुमारे ५ हजार सीसीटिव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने संपूर्ण शहरावर नजर असणार आहे.शहरातील सर्व पोलीस ठाण्यांतील अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हद्दीत येणाऱ्या संवेदनशिल ठिकाणे, विर्सजन पॉईंटवर विशेष बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबई : बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर मंगळवारी बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. अनंत चतुर्दशीनिमित्ताने मुंबईपोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. शहरात बसविण्यात आलेल्या सुमारे ५ हजार सीसीटिव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने संपूर्ण शहरावर नजर असणार आहे.

 

शहराच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस दलातील ३५ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दिमतीला केंद्रीय व राज्य राखीव बलाच्या तुकड्या जागोजागी तैनात ठेवण्यात आल्या आहेत. राज्य दहशतवाद विरोधी दल (एटीएस), बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस), शिघ्रकृती दल, फोर्सवन आणि सिव्हील डिफेन्स तैनात ठेवण्यात आल्या आहेत. तसेच  वाहतूक पोलीस जवान रस्त्यावर वाहतूकीची कोंडी होऊ नये म्हणून तैनात ठेवले आहेत. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांतील अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हद्दीत येणाऱ्या संवेदनशिल ठिकाणे, विर्सजन पॉईंटवर विशेष बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.       

पोलिसांनी अभिलेखावरील गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासोबतच फेसबूक, व्हॉटसअॅप सारख्या सोशल नेटवर्कींग साईटवर करडी नजर ठेवली आहे. याच सोशल नेटवर्कींग साईटवरून भडकाऊ संदेश पसरवले जाऊन अफवांच्या माध्यमातून सामाजिक तंटे निर्माण झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्याने पोलिसांनी आधीच खबरदारीची पावले उचलली आहेत. प्रत्येक विसर्जनाच्या ठिकाणी पोलिसांमार्फ़त जलतरणपट्टू तसेच तटरक्षक दल आणि नौदलाच्या मदतीने बोटी, लॉन्चेस उपलब्ध करण्यात येणार आहे.  सर्वानी नियमांचे पालन करत, विनाकारण विसर्जन स्थळी गर्दी करू नये, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ड्रग्ज कनेक्शनबाबत भाजपा नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र 

 

सुशांत आत्महत्येच्या तपासातील पोलीस अधिकाऱ्याला कोरोना; CBI पथकाचीही होणार टेस्ट

 

संदीप सिंहच्या चौकशीसाठी आलेल्या तक्रारी सीबीआयकडे पाठवणार, अनिल देशमुखांनी दिली माहिती 

 

जंगलात आढळला शिर नसलेला अल्पवयीन मुलीचा मृतदेह, बलात्कार करून हत्या केल्याची शक्यता

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईGanpati Festivalगणेशोत्सवcctvसीसीटीव्ही