खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्यांची पोलिसांकडून चौकशी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 11:08 PM2021-01-30T23:08:57+5:302021-01-30T23:09:31+5:30

neil somaiya : खंडणीचा प्रकार नील सोमय्या यांच्या कार्यालयात झाला होता, मात्र त्यावेळी नील सोमय्या तेथे उपस्थित नव्हते, असे तक्रारीत नमूद केले आहे.

Mumbai Police interrogate Kirit somaiya son neil somaiya in extortion case | खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्यांची पोलिसांकडून चौकशी 

खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्यांची पोलिसांकडून चौकशी 

googlenewsNext

मुंबई : भाजपाचे माजी खासदार किरीट सौमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांची मुलुंड पोलिसांनी शनिवारी सुमारे दोन तास चौकशी केली. एका ठेकेदाराविरुद्धच्या खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. आवश्यकता वाटल्यास त्यांना पुन्हा पाचारण करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेची कामे करीत असलेल्या एका ठेकेदाराला खंडणीसाठी तिघांनी धमकाविले होते. त्याबाबत त्याने गेल्यावर्षी त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिली आहे. खंडणीचा प्रकार नील सोमय्या यांच्या कार्यालयात झाला होता, मात्र त्यावेळी नील सोमय्या तेथे उपस्थित नव्हते, असे तक्रारीत नमूद केले आहे.

त्यामुळे या गुन्ह्याच्या अनुषंगाने नील सोमय्या यांना शनिवारी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास कळविले होते. त्यानुसार, दुपारी त्यांच्याकडे सविस्तर माहिती घेऊन जबाब नोंदविण्यात आला. सुमारे दोन तास मुलुंड पोलीस ठाण्यात त्यांचा जबाब नोंदविण्यात आला.
 

Web Title: Mumbai Police interrogate Kirit somaiya son neil somaiya in extortion case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.