शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

दिराने वहिनीचा काटा काढण्यासाठी दिली ६० लाखांची सुपारी, हायप्रोफाईल दुहेरी हत्येच्या डाव मुंबई पोलिसांनी उधळला

By पूनम अपराज | Updated: December 22, 2020 20:19 IST

Crime News : दुहेरी हत्याकांड घडण्याआधीच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ९ ने कट उधळून लावला. 

ठळक मुद्दे विनोद भगतनं लंडन येथील मामूला दोघांच्या हत्येची सुपारी दिली होती. त्यानुसार मामूने उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे ती सुपारी फिरवली होती.

मुंबईपोलिसांच्या गुन्हे शाखेने एका हायप्रोफाइल हत्येच्या सुपारीच्या गुन्ह्याची उकल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी ५ आरोपींना अटक केली आहे. सुमारे ६० लाख रुपये सुपारी देवून वहिनी आणि तिच्या बहिणीच्या हत्येचा कट रचल्याचे उघड झाले आहे. मात्र, दुहेरी हत्याकांड घडण्याआधीच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ९ ने कट उधळून लावला. 

मुंबईतील कुप्रसिद्ध मटका किंग सुरेश भगत याची पत्नी जया भगत आणि तिची बहिणीच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती. ही सुपारी सुरेश भगत याचा भाऊ विनोद भगत यानं दिल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. विनोद भगतनं लंडन येथील एका व्यक्तीला सुमारे ६० लाख रुपयांची सुपारी देऊन दोघींची हत्या करण्यास सांगितले असल्याची माहिती पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मटका किंग सुरेश भगत याची पत्नी जया भगत आणि तिची बहीण जामिनावर तुरुंगाबाहेर होत्या. या दोघींवर सुरेश भगत याची हत्या केल्याचा आरोप आहे. सुरेश भगतचा भाऊ विनोद याला आपल्या भावाच्या हत्येचा बदला घ्यायचा होता. त्यातूनच त्यानं वहिनी जया भगत आणि तिच्या बहिणीच्या हत्येची सुपारी दिली होती. विनोद भगतनं लंडन येथील मामूला दोघांच्या हत्येची सुपारी दिली होती. त्यानुसार मामूने उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे ती सुपारी फिरवली होती.

बिजनौरच्या आरोपींनी अहमदाबाद आणि मुंबई येथील आरोपींच्या मदतीने जया भगत आणि तिच्या बहिणीची रेकी केली होती. त्यानुसार ते १८ डिसेंबरला खारदांडा रोडवरील शुभांगन हॉटेलसमोर उत्तर प्रदेशातील ते इसम दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास येणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. मात्र हत्या करण्याआधीच मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने २ आरोपींना अटक केली. आरोपींकडून २ गावठी कट्टे आणि ६ जिवंत काडतुसे जप्त, १३ मोबाईल्स, आधारकार्ड, स्टेट बँकेचे २ एटीएम कार्ट, निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड, महिलांचे दोन रंगीत फोटो आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. नंतर पोलिसांनी बिजनौर येथून एक तर गुजरातमधील पालनपूर येथून एक अशा पाच आरोपींना अटक केली आहे. एक आरोपी लंडन येथील असून तो फरार आहे. याप्रकरणी आणखी काही धागेदोरे हाती लागतात का, याचाही शोध पोलिस घेत आहेत.

टॅग्स :MurderखूनMumbaiमुंबईPoliceपोलिसArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेशGujaratगुजरात