शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई पोलिसांना मोठं यश! रवी पुजारीचा साथीदार रेडिओवाला गुन्हे शाखेच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 20:13 IST

आज मोक्का न्यायालयात हजर करण्यात आलं असून उद्यापर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ठळक मुद्देकुख्यात गुंड रवी पुजारीच साथीदार ओबेद रोडीओवाला (४६) याचा अखेर ताबा मुंबई गुन्हे शाखेला मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अनिस याच्यासह १० जणांना अटक केली होती.  

मुंबई - सुपरस्टार शाहरूख खान, दिग्दर्शक महेश भट्ट, निर्माता करीम मोरानी यासारख्या बॉलिवूडमधील अनेक बड्या हस्तींना खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देत दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंड रवी पुजारीच साथीदार ओबेद रोडीओवाला (४६) याचा अखेर ताबा मुंबई गुन्हे शाखेला मिळाला आहे. बेकायदेशीर रित्या अमेरिकेत राहणाऱ्या ओबेद रेडिओवाला याला अमेरिकेने अटक केल्यानंतर त्याचा ताबा सीबीआयला देण्यात आला होता. बुधवारी  सीबीआयने त्याचा ताबा मुंबई  गुन्हे शाखेला दिला असून ओबेद याला मुंबईत आणण्यात आले असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्याला आज मोक्का न्यायालयात हजर करण्यात आलं असून उद्यापर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

रवी पुजारी या गँगस्टरचा हस्तक असलेल्या ओबेद याने २०१४ साली दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यावर गोळीबार केला होता. त्याचबरोबर निर्माता करीम मोरानीच्या बंगल्यावर गोळीबार करून बॉलिवूडमध्ये दहशद निर्माण केली होती. या प्रकरणी त्याच्याविरोधात मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. चित्रपटाच्या परदेशातील वितरणाचे हक्क मिळवण्याबरोबरच अनेक बॉलिवूडमधील हस्तींकडे खंडणी मागणाऱ्या ओबेद रेडिओवाला याने स्वतःचे आडनाव मर्चंट ठेवून बनावट पासपोर्टच्या मदतीने तो अमेरिकेला गेला. मात्र बनावट पासपोर्टप्रकरणी अमेरिकेत त्याला अटक असून  नुकतेच त्याला तेथून हद्दपार करण्यात आले होते. अशा वेळी याची माहिती मुंबई पोलीस आणि सीबीआयला समजताच त्यांनी ओबेद याच्या प्रत्यार्पणाची तयारी सुरू केली होती. अखेर त्याचा ताबा सीबीआयला मिळताच त्याला दिल्लीला आणण्यात आले होते. दरम्यान, ओबेद रोडिओवालावर मुंबईतही अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. त्या गुन्ह्यात पोलिसांनी रोडिओवालाचा ताबा मागितला होता. त्यासाठी लागणाऱ्या परवानग्याही घेत रोडिओवालाचा ताबा घेण्यासाठी मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाचे पोलीस दिल्लीला गेले. प्रसिद्ध  दिग्दर्शक महेश भट्ट आणि निर्माते करीम मोरानी यांच्या घरावर केलेल्या गोळीबाराप्रकरणी तो पोलिसांना पाहिजे होता. अनिस आणि एसरात हे ओबेद याचे भाऊ असून त्यांचा देखील गोळीबार प्रकरणात हात होता. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अनिस याच्यासह १० जणांना अटक केली होती.  

 

 

टॅग्स :Ravi pujariरवि पूजारीAmericaअमेरिकाpassportपासपोर्टArrestअटकMCOCA ACTमकोका कायदा