शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत अमलीपदार्थ विक्रेते रडारवर; पार्टी ड्रग्ज जप्त, वरळी, अंधेरीत कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 05:06 IST

वांद्रे कक्षाने अंधेरी परिसरातून २५ ग्रॅम एमडी तस्करी प्रकरणी नायजेरीयन तरुणाला अटक केली आहे. एकूण कारवाईत १५ लाखांहून अधिक किमतीचे ड्रग्ज हस्तगत करण्यात आले आहेत.

मुंबई : अमलीपदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध अमलीपदार्थविरोधी पथकाने (एएनसी) धडक मोहीम हाती घेतली आहे. अवघ्या २४ तासांत ४ ठिकाणी छापे मारत एलएसडी पेपर, एमडीएमएसोबत चरस आणि एमडींचे लाखोंचे पार्टी ड्रग्ज जप्त केलेआहेत. वरळी, कुर्ला, अंधेरी आणि मालवणी या भागात ही कारवाई केली आहे.वरळी परिसरात ड्रग्जची तस्करी होणार असल्याची माहिती वरळी कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांना मिळाली. त्यानुसार, तपास पथकाने गुरुवारी लोअर परळ, मथुरादास मिल संकुल परिसरातून लक्ष्मण पादुकोडे राजन उर्फ निखिल या तरुणाला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून ८१ एलएसडी पेपर आणि ११ ग्रॅम एमडी आढळले. पथकाने ड्रग्ज जप्त केले.गेल्या वर्षी निखिलला याच पथकाच्या कांदिवली कक्षाने एलएसडी विक्रीप्रकरणी अटक केली होती.या कारवाईपाठोपाठ कांदिवली कक्षाने मालवणीतून सलीम खान उर्फ सलीम टेम्पो या तस्कराला पाऊण किलो चरससह अटक केली. तर आझाद मैदान कक्षाने कुर्ला येथील कल्पना चित्रपटगृहाजवळून असगरअली शेखला बेड्याठोकल्या. त्याच्या जवळून दीड किलो चरस हस्तगत केला आहे.तर वांद्रे कक्षाने अंधेरी परिसरातून २५ ग्रॅम एमडी तस्करी प्रकरणी नायजेरीयन तरुणाला अटक केली आहे. एकूण कारवाईत १५ लाखांहून अधिक किमतीचे ड्रग्ज हस्तगत करण्यात आले आहेत. अटक आरोपींकडे अधिक तपास सुरू असून त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध पथकाकडून सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी