शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

मला कोरोना झालाय म्हणत पती घर सोडून गेला; पोलिसांना इंदूरमध्ये गर्लफ्रेंडसोबत सापडला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 4:17 PM

इकडे पतीसोबत संपर्क होऊ न शकल्याने हैराण झालेली पत्नी मदतीसाठी पोलिसांकडे गेली. तिने पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

नवी मुंबईतून एक अजब घटना समोर आली आहे. इथे एका पतीने पत्नीला खोटं सांगितलं की, तो कोरोना पॉझिटिव्ह आहे. त्याने कोविड सेंटरमध्ये भरती होण्याचं आणि परिवाराला संक्रमणापासून वाचवण्याचं कारण सांगितलं. आणि तो त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत फरार झाला. इकडे पतीसोबत संपर्क होऊ न शकल्याने हैराण झालेली पत्नी मदतीसाठी पोलिसांकडे गेली. तिने पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी या महिलेच्या पतीला गर्लफ्रेंडसोबत इंदूरमधून अटक केली.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, २४ जुलैला तळोजा येथे राहणाऱ्या २८ वर्षीय व्यक्तीने पत्नीला फोन केला आणि सांगितले की, तो कोरोना पॉझिटिव्ह झालाय. तो म्हणाला की, तो फार त्रासात आहे आणि जीव द्यायला जात आहे. हे ऐकून धक्का बसलेली पत्नी रडतच त्याला रोखू लागली, पण त्याने फोन कट केला.

सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांनी सांगितले की, या व्यक्तीने त्याचा फोन स्विच ऑप केला होता. दुसऱ्या दिवशी त्याच्या मेहुण्याला भावोजीची बाइक वाशीच्या एका गल्लीत बेवारस पडलेली दिसली. बाइकवरच त्याचं  हेल्मेट, ऑफिस बॅग आणि पाकिट ठेवलं होतं. परिवाराने त्याच्या बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली.

वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर संजीव धुमल म्हणाले की, पोलिसांची टीम या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी गेली. वाशीच्या आजूबाजूच्या नाल्यांमध्ये त्याचा शोध घेण्यात आला. सर्व कोविड सेंटर्सवर त्याचा शोध घेण्यात आला. नंतर त्याचा फोन सर्व्हिलांसवर लावण्यात आला. बराच शोध घेतल्यावर पोलिसांनी त्याचा शोधलं.

पोलिसांनी सांगितले की, या व्यक्तीने त्याच्या मोबाइलमधील पहिलं सिम बंद करून नवीन सिम टाकलं. पोलिसांना सर्व्हिलांसच्या माध्यमातून समजलं की, मोबाइल इंदूरमध्ये सुरू आहे. मग पोलिसांची एक टीम इंदूरला पोहोचली आणि त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. पोलिसांनी सांगितले की, तो इंदूरमध्ये आपली ओळख आणि नाव बदलून गर्लफ्रेंडसोबत एका भाड्याच्या घरात राहत होता. 

हे पण वाचा :

दारुच्या नशेत तरुणीवर जबरदस्ती, मैत्रिणीच्या मदतीने केला तरुणाचा खून

संतापजनक ! मदतीच्या बहाण्याने मध्यप्रदेशच्या मजूर महिलेवर ठेकेदाराचा अत्याचार

धक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी