शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आधी जबरदस्ती, नंतर आत्महत्येची भीती घालत केले अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 01:58 IST

आत्महत्या करण्याची धमकी देत १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना वडाळा परिसरात उघडकीस आली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. 

मुंबई :  आत्महत्या करण्याची धमकी देत १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना वडाळा परिसरात उघडकीस आली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. वडाळा परिसरात १९ वर्षीय तक्रारदार तरुणी कुटुंबीयांसोबत राहण्यास आहे. ती महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. ती राहण्यास असलेल्या इमारतीतील ४० वर्षीय आरोपीच्या घरी तिची मामासोबत ये-जा सुरू होती. मे २०२०मध्ये तरुणी घरात एकटी असल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तरुणीने याबाबत कुणाकडे वाच्यता करू नये यासाठी आरोपीने आत्महत्या करण्याची भीती घातली.  तरुणीने याबाबत कुणाला सांगितले नाही. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात माफी मागायची असल्याचे सांगत तरुणीला घरी बोलावून घेतले. तरुणी घरी जाताच तिच्यावर बलात्कार केला. यावेळीही हातावर वार केले.  पुढे बलात्काराचा व्हिडीओ करून धमकाविण्यास सुरुवात केली.   जूनमध्ये तो जहाजावर कामासाठी निघून गेला. पुढे, आत्महत्या करणार असल्याचे सांगत व्हॉट्सॲप वरून संवाद सुरू होता. पुन्हा आत्महत्येची धमकी देत, चॅटिंग करण्यास भाग पाडले. सुसाइट नोटमध्ये तुझ्यामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद करणार जेणेकरून शिक्षा होईल, अशी भीतीही तरुणीला वेळोवेळी घालण्यात आली. शिवाय ते व्हिडीओही सोशल मीडियावर पाठविण्याची धमकी देत, नग्नावस्थेत व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडले आहे. यातून सुटका होत नाही तोच, ३० मार्चमध्ये त्याच्या पत्नीने पतीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर तरुणीच्या आईलादेखील शिवीगाळ करताच तरुणीने बुधवारी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई