शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई व्हाया दिल्ली! सफाई कामगाराच्या हत्येप्रकरणी आरोपीच्या आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 19:04 IST

मोहम्मद शकील उर्फ सय्यद अली (वय २२) याचा खून केल्यानंतर राजाबाबू याने त्याचा मोबाईल चोरून अनेकांना फोन करून तपासात बाधा आणण्याचा प्रयत्न केला होता. 

ठळक मुद्देसफाई कामगाराची हत्या केल्याप्रकरणी आरोपीला दिल्लीतून ताब्यात घेतलेऑलिव्ह ट्रेड अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीत मोहम्मद शकील सफाई कामगार म्हणून कामाला होता. गुन्ह्याचा तपास भरकटवण्यासाठी आरोपीने प्रयत्न केला

मुंबई - आग्रीपाड्यात खासगी कंपनीत सफाई कामगाराची हत्या केल्याप्रकरणी आरोपीला दिल्लीतून ताब्यात घेतले. राजाबाबू असं त्याचं नाव आहे. मोहम्मद शकील उर्फ सय्यद अली (वय २२) याचा खून केल्यानंतर राजाबाबू याने त्याचा मोबाईल चोरून अनेकांना फोन करून तपासात बाधा आणण्याचा प्रयत्न केला होता. 

आग्रीपाड्यातील नायर मार्गावरील टोपाझ सहकारी सोसायटीमधील ऑलिव्ह ट्रेड अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीत मोहम्मद शकील सफाई कामगार म्हणून कामाला होता. हैदर अब्दुल शाहिद सय्यद यांना मोहम्मद शकील रक्ताच्या थरोळ्यात पडल्याचे आढळून आले. त्यांनी आग्रीपाडा पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी मोहम्मद शकीलला तातडीने नायर रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

किरकोळ वादातून मोहम्मद शकीलच्या हत्या केल्यानंतर राजाबाबूने त्याचा मोबाईल चोरला आणि त्यावरून दोन - तीन जणांना फोन केले. त्यानंतर तो मोबाईल विकून टाकला. त्यामुळे त्या मोबाईलचा मागोवा काढत पोलीस भलत्याच ठिकाणी पोहचतील. अशा प्रकारे गुन्ह्याचा तपास भरकटवण्यासाठी आरोपीने प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी दिल्लीत फरार झाला. याबाबत आग्रीपाडा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी आरोपीचा दिल्लीतून ताबा घेतला. 

टॅग्स :MurderखूनArrestअटकdelhiदिल्लीPoliceपोलिस