शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai: डिलिव्हरी बॉयचा शिवसैनिकांवर मारहाणीचा आरोप; पोलिसांकडून चार कार्यकर्त्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 07:58 IST

Amazon च्या डिलिव्हरी बॉयनं शिवसैनिकांवर केला मारहाणीचा आरोप. समता नगर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल.

ठळक मुद्देAmazon च्या डिलिव्हरी बॉयनं शिवसैनिकांवर केला मारहाणीचा आरोप.समता नगर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल.

मुंबईत एका डिलिव्हरी बॉयनं शिवसैनिकांवर गंभीर आरोप केले आहेत. डिलिव्हरी बॉयनं शिवसैनिकांवर मारहाणीचा आरोप केला आहे. दरम्यान, पीडित व्यक्तीच्या बहिणीचा आरोप आहे की पोलिसांनी त्वरित कारवाई करण्याऐवजी तक्रारीच्या काही तासांनंतर FIR दाखल केला. दरम्यान, या प्रकरणी पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. तसंच या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून दोन जण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

मुंबईतील समता नगर पोलीस क्षेत्रात ही घटना समोर आली आहे. मुंबईतील कांदिवली पूर्व परिसरात अॅमेझॉनच्या डिलिव्हरी बॉयसोबत काही शिवसैनिकांनी मारहाण केली. मारहाणीत राहुल शर्मा नावाच्या डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात सहा टाके लागले आहेत. यानंतर या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीनंतर शिवसेनेच्या शाखा प्रमुखांसह चार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. दोन आरोपी सध्या फरार आहेत. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती समता नगर पोलिसांकडून देण्यात आली.  दरम्यान, राहुल शर्मा याच्या बहिणीनं आरोप केला की ५ तास वाट पाहिल्यानंतर समता नगर पोलिसांनी त्यांची तक्रार ऐवली आणि आरोपीविरोधात एफआयआर दाखल केला. कादिवली पूर्व परिसरात राहणारा राहुल शर्मा हा मंगळवारी दुपारी अॅमेझॉनची ऑर्डर घेऊन जात होता. रस्त्यात पाऊस लागल्यानं तो पोयसर येथील शिवसेना शाखेबाहेर असलेल्या छताखाली उभा राहिला. तेव्हा एका व्यक्तीनं त्याच्या सामानावर पाय ठेवला. परंतु जेव्हा त्यानं त्या व्यक्तीला विचारणा केली तेव्हा काही शिवसैनिकांनी आपल्यासह मारहाण केली असं राहुल शर्मानं सांगितलं. 

टॅग्स :PoliceपोलिसShiv Senaशिवसेनाamazonअ‍ॅमेझॉनCrime Newsगुन्हेगारी