शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बीकेसीमधून सुरू होते कोट्यवधींचे ड्रग्ज रॅकेट, १० कोटींचे एमडी जप्त; गुन्हे शाखेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 06:47 IST

पोलिसांनी याप्रकरणी कमरुद्दीन शेख, रियाज अन्सारी आणि सलमान खान या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. सलमान हा जामिनावर बाहेर असताना ड्रग्ज तस्करीत सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. 

मुंबई : वांद्रे पूर्वेकडील वांद्रे - कुर्ला संकुल (बीकेसी) येथून चालणाऱ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करत तिघांना बेड्या ठोकण्यास अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या वरळी पथकाला यश आले आहे. त्रिकुटाकडून दहा कोटींचे ५ किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी कमरुद्दीन शेख, रियाज अन्सारी आणि सलमान खान या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. सलमान हा जामिनावर बाहेर असताना ड्रग्ज तस्करीत सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. 

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, बीकेसी परिसरात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज साठा करण्यात आला असून, येथून मोठ्या  ड्रग्ज खरेदी-विक्री आणि पुरवठा केला जात असल्याच्या मिळालेल्या माहितीच्या आधारे वरळी युनिटचे प्रभारी पोलिस निरीक्षक संदीप काळे, सहायक पोलिस निरीक्षक संतोष साळुंखे, सहायक पोलिस निरीक्षक अमोल कदम, पोलिस उपनिरीक्षक शैलेश देसाई, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र सावंत आणि पथकाने शुक्रवारी रात्री बीकेसी परिसरात गस्त सुरू केली.

बीकेसी अग्निशमन केंद्राजवळ तीन संशयित या पथकाला दिसले. पथकाने सापळा रचून कमरुद्दीन, रियाज आणि सलमान या तिघांनाही ताब्यात घेतले. झडतीमध्ये कमरुद्दीन व रियाज यांच्याजवळ १६० ग्रॅम एमडी पोलिसांना सापडले. याप्रकरणी अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवत तिन्ही आरोपींना अटक केली आहे. कमरुद्दीन आणि रियाज यांना सलमान याने हे ड्रग्ज पुरवल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी बीकेसी येथेच छापेमारी केली.

- सलमान हा पोलिस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात २०२१ मध्ये नागपूरमध्ये वाणिज्य स्वरूपाचा गुन्हा दाखल होता.  या गुन्ह्यात तो जामिनावर बाहेर पडल्यानंतर तो ड्रग्ज विक्रीच्या व्यवसायात सक्रिय झाल्याची माहिती गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली आहे. त्यानुसार या ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यासाठी तिन्ही आरोपींकडे कसून चाैकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी