शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

Mukesh Ambani Bomb Scare: तिहार जेलमधील खतरनाक दहशतवादी तहसीन अख्तरकडून मोबाईल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 09:18 IST

Mansukh Hiren case: सुरक्षा दलांनी जेल नंबर-8 मध्ये छापा टाकला. इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी तहसीनच्या बराकीमधून एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. याच मोबाईलवरून टेलिग्राम चॅनेल अॅक्टिव्हेट करण्यात आला होता.

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणाची (Mukesh Ambani Bomb Scare) लिंक दिल्लीच्या तिहार जेलपर्यंत लागल्याने गुरुवारी सायंकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत तुरुंगात छापेमारी करण्यात आली. यामध्ये खतरनाक दहशतवादी तहसीन अख्तरच्या बराकीतून मोबाईल जप्त करण्यात आला आहे. (Mobile seized from Tihar jail in mukesh ambani bomb scare case.) 

सुरक्षा दलांनी जेल नंबर-8 मध्ये छापा टाकला. इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी तहसीनच्या बराकीमधून एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. याच मोबाईलवरून टेलिग्राम चॅनेल अॅक्टिव्हेट करण्यात आला होता. तहसीन अख्तर हा पटनाच्या गांधी मैदानातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये बॉम्ब स्फोट, हैदराबाद बॉम्बस्फोट आणि बोधगया बॉम्बस्फोटामध्ये सहभागी होता. 

तहसीन अख्तरच्या बराकीमध्ये जो मोबाईल जप्त करण्यात आला आहे त्यामध्ये टोर ब्राऊजरद्वारे व्हर्च्युअल नंबर बनविण्यात आला होता. याच नंबरवरून टेलिग्राम अकाऊंट बनविण्यात आले होते. यानंतर धमक्यांचे पोस्टर तयार करण्यात आले. आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशन सेल तहसीन अख्तरला रिमांडवर घेून चौकशी करणार आहे. 

याचबरोबर आणखी एक मोबाईल नंबर पोलिसांच्या रडारवर आहे. हा नंबर सप्टेंबरमध्ये अॅक्टिव्हेट झाला होता. जो नंतर बंद करण्यात आला. दोन मोबाईल नंबर खोट्या कागदपत्रांवर खासकरून तिहार जेलमध्ये असलेल्या गुन्हेगारांसाठी खरेदी करण्यात आले होते. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, २६ फेब्रुवारी रोजी टेलीग्राम चॅनेल तयार करण्यात आले होते आणि  अंबानींच्या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ ठेवल्याची जबाबदारी घेणारी मेसेज २७ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा अंबानींच्या टेलिग्राम मेसेजिंग अॅपवर पोस्ट करण्यात आला होता. या मेसेजमध्ये क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे पाठवण्याची मागणी देखील केली होती आणि ती जमा करण्यासाठीच्या लिंकचा उल्लेख केला होता.

चौकशीदरम्यान ती लिंक “उपलब्ध नाही” म्हणून आढळले, त्यामुळे तपास करणार्‍यांना हे कोणीतरी त्रास देण्यासाठी कृत्य करत असल्याचा संशय आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. नंतर २८ फेब्रुवारीला जैश-उल-हिंदचा आणखी एक मेसेज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आला आणि घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओच्या प्रकरणात आपली कोणतीही भूमिका नसल्याचा दावा केला गेला. या प्रकरणातील तपास सुरुवातीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केला होता. नंतर गृहमंत्र्यांनी याचा तपास एटीएसकडे सुपूर्द केला. त्यानंतर देखील या प्रकरणाचा तपास एटीएसकडून केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या NIA कडे वळविण्यात आला आहे. 

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीjailतुरुंगterroristदहशतवादीIndian Mujahideenइंडियन मुजाहिदीनMansukh Hirenमनसुख हिरण