शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मुच्छड पानवाला पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात, गुन्हे शाखेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 07:32 IST

ई- सिगारेटचा साठा जप्त, गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : हायप्रोफाइल बिझनेसमनपासून बॉलिवूडच्या सेलिब्रिटीपर्यंत मोठा ग्राहकवर्ग असलेल्या मुच्छड पानवाला म्हणजेच शिवकुमार तिवारी पुन्हा एकदा पोलिस कारवाईत अडकला आहे. अमली पदार्थविरोधी विभागाने (एएनसी) केलेल्या कारवाईत पानवालासह एकूण चार ठिकाणाहून १३ लाख किमतीचा प्रतिबंधित ई-सिगारेटचा साठा जप्त केला आहे. यापूर्वीही पानवालाविरोधात २०२१ मध्ये एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटकेची कारवाई केली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आहे.

धूम्रपान सोडण्यास मदत करण्याच्या नावाखाली शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक सिगारेटची विक्री करणाऱ्याविरोधात गुन्हे शाखेची धडक कारवाई सुरू आहे. एएनसीने गेल्या दोन दिवसांत चार ठिकाणी कारवाई केली. यामध्ये मुच्छड पानवालाच्या दुकानातही झाडाझडती घेतली. दुकानातून मोठ्या प्रमाणात ई- सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी व्हीपी रोड पोलिसांनी गुन्हा नोंदवत अटकेची कारवाई केली आहे. विविध कारवाईत याप्रकरणी एकूण चार गुन्हे नोंदवत १३ लाख ६५ हजार रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने एकच  खळबळ उडाली असून गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. 

ड्रग्जही जप्त एएनसीने केलेल्या कारवाईत एका हुक्का गोडाऊनला सील ठोकून ६९९ हुक्का पॉट्स जप्त करण्यात आले. याप्रकरणी एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर, बोरीवलीतून १५ लाख किमतीचे कोकेन आणि एमडीचा साठाही जप्त करण्यात आला आहे. 

१६ आरोपी एएनसीने गेल्या दोन दिवसांत ई- सिगारेट, हुक्का तसेच ड्रग्ज संबंधित केलेल्या कारवाईत १६ आरोपींविरोधात विविध पोलिस ठाण्यांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यापैकी १० ताब्यात असून ६ जणांचा शोध सुरू आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस