शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महिलेला मारून झाडांमध्ये फेकून दिलं, ३ वर्षाच्या मुलाने उलगडलं आईच्या हत्येचं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 19:43 IST

मंगळवारी सकाळी सिंहवाहिनी मंदिर रेगवामध्ये एक तीन वर्षाचा मुलगा रडत आढळून आला. गावातील लोकांनी पोलिसांनी सूचना दिली आणि..

मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यातील मैहरच्या अमदरामध्ये एका तीन वर्षीय बेवारस मुलाने आपल्या आईच्या हत्येचं रहस्य उघड केलं. पोलिसांनी मृत महिला आणि हरवलेल्या मुलाच्या आधारे तपास केला तर ही खळबळजनक घटना समोर आली.

मंगळवारी सकाळी सिंहवाहिनी मंदिर रेगवामध्ये एक तीन वर्षाचा मुलगा रडत आढळून आला. गावातील लोकांनी पोलिसांनी सूचना दिली आणि पोलीस त्याला घेऊन त्याच्या आई-वडिलांचा शोध घेत होते. दुपारी मंदिरापासून दोनशे मीटर दूर अंतरावर एका महिलेचा मृतदेह झुडपांमध्ये आढळून आला होता. महिलेचीही ओळख पटली नव्हती. 

अशात सापडलेला मुलगा आणि मृत महिला यांचा संबंध जोडून पोलिसांनी तपास सुरू केला. पोलीस मुलाला घेऊन महिलेच्या मृतदेहाजवळ गेले तर मुलगा आई-आई करत ओरडला. पोलिसांनी चौकशी केली तर त्याने सांगितलं की, वडिलांनी आईची हत्या केली. पण तो ना त्याचं नाव सांगू शकला ना वडिलांचं. (हे पण वाचा : भयंकर! चेटकीण असल्याच्या संशयातून महिलेची हत्या; 6 वर्षीय लेकाने सांगितला घडलेला धक्कादायक प्रकार)

घटनास्थळापासून एक किलोमीटर दूर अंतरावर एनएच ३० वर एका कार आणि जीपची टक्कर झाली होती. संशयाच्या आधारावर वाहनांची पाहणी केली तर प्रकरण आणखी चिघळलं. जीपमद्ये महिलेचं तुटलेलं हाड आणि मुलाचे कपडे सापडले. यावरून हे स्पष्ट झालं की, महिला आणि मुलाला याच गाडीतून नेण्यात आलं होतं. महिलेची हत्या करून मुलाला बेवारस सोडून देण्यात आलं.  

अपघात झालेली गाडी कटनी जिल्ह्यातील आहे. मुलाने मृत महिला त्याची आई असल्याचं सांगितल्याने आणि वडिलांनी हत्या केल्याचं सांगितल्याने अंदाज हा लावला गेला की, महिलेची हत्या करून तिला बोलोर कारमधून नेण्यात आलं असेल.नंतर केवळ १२ तासात हत्येची पूर्ण कहाणी समोर आली. महिलेच्या हातावर लक्ष्मी असं नाव लिहिलं होतं. पोलीस धागेदोरे जुळवत कारच्या मालकापर्यंत पोहोचले. (हे पण वाचा : धक्कादायक! मोठ्या बहिणीसोबत लहान भावाने केला रेप, गर्भवती झाली तेव्हा झाला घटनेचा खुलासा)

तपासातून समोर आलं की, अखिलेश यादव नावाच्या व्यक्तीचे मृत लक्ष्मीबाई गोडसोबत संबंध होते. गेल्या सहा महिन्यांपासून लक्ष्मी अखिलेशसोबत राहत होती. मात्र, दीड महिन्यांपूर्वी अखिलेशचा विवाह दुसऱ्या महिलेशी झाला. यामुळे लक्ष्मी त्याला त्रास देत होती. याचाच राग धरून अखिलेशने तीन साथीदारांच्या मदतीने लक्ष्मीची हत्या करण्याचा प्लॅन केला. आधी तो फिरायला जाण्याचं कारण देत लक्ष्मी आणि मुलाला घेऊन गेला. 

नंतर महिलेचा दोराने गळा आवळून तिची हत्या केली आणि मुलाला मंदिराजवळ सोडून फरार झाला. त्यानंतर काही अंतरावर त्यांच्या कारचा अपघात झाला. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. मुलाला मुख्य साक्षीदार बनवलं जाईल. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी