शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेन्डसाठी अट्टल चोर बनला प्रियकर, सॅनिटरी पॅडचीही करत होता चोरी; CCTV मुळे भांडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 16:37 IST

बैतूलच्या बाजारातील एका औषध दुकानाचा मालक काही दिवसांपासून चिंतेत होता. कारण त्याच्या हिशेबात मोठा फरक दिसत होता.

असं म्हणतात की, प्रेम आणि युद्धात सगळं काही माफ असतं. पण कधी कधी ही बाब चुकीचीही सिद्ध होते. प्रेमाच्या नादात प्रियकर चोर झाला आणि त्याला चोर बनवणारी त्याची प्रेयसीच असेल तर....? अशीच एक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या बैतूलमधील ही घटना आहे. इथे आपल्या प्रेयसीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी औषधाच्या दुकानात काम करणारा तरूण दुकानातून सतत पैसे आणि दुसऱ्या वस्तू चोरी करत होता. संशय आल्यावर दुकानदाराने सीसीटीव्ही फुटेज चेक केलं तर बघून हैराण झाला. 

जळपास २० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुकानाचा कर्मचारी पैसे आणि दुसऱ्या वस्तू चोरी करताना दिसला. चोरीच्या सर्व घटना तेव्हा घडल्या जेव्हा दुकानदार नमाजसाठी बाहेर जात होता. सध्या आशिकचा चोर बनलेला आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.

बैतूलच्या बाजारातील एका औषध दुकानाचा मालक काही दिवसांपासून चिंतेत होता. कारण त्याच्या हिशेबात मोठा फरक दिसत होता. दुकानदाराला त्याचा कर्मचारी अमन भोरसेवर संशय आला. तर त्याने सीसीटीव्ही फुटेज चेक केले.

सीसीटीव्ही फुटेज पाहून दुकानदार हैराण झाला. त्याचा कर्मचारी अमन अनेक दिवसांपासून चोरी करत होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, आरोपी अमन दुकानातून कॅश काउंटर उघडून मोठ्या चलाखीने पैसे चोरी करत होता. चोरी केल्याचे एक दोन नाही तर २० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. अमन ही चोरी तेव्हा करत होता जेव्हा त्याचा मालक नमाज अदा करण्यासाठी जात होता.

दुकानदार सारिक खानच्या तक्रारीनुसार, आरोपी अमन कॅशसोबत सॅनिटायजर, औषधं, मास्क आणि सॅनिटरी पॅडही चोरी करत होता. पोलिसांनी जेव्हा अमनला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी केली तर त्याने आश्चर्यकारक खुलासा केला. अमनने आतापर्यंत ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम आणि इतर वस्तूंची चोरी केल्याचा खुलासा केला आहे. पोलीस अधिकारी रत्नाकर हिंग्वे म्हणाले की, आरोपी अमन नर्सिंगचा विद्यार्थी आहे आणि औषधाच्या दुकानात पार्ट टाइम काम करत होता. गर्लफ्रेन्डच्या इच्छा पूर्ण करण्याच्या नादात आरोपीने चोरीसारखं काम केलं. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी