शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

बनावट पासबुक आणि एफडी, लोकांनी जमा केलेली आयुष्यभराची कमाई पोस्टमास्तरनं IPL च्या सट्ट्यात उडवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 12:27 IST

आता पैशांसाठी लोक मारतायत फेऱ्या, कार्यालयाकडूनही उत्तर मिळत नसल्याची व्यक्त केली खंत.

भोपाळ : आयपीएलच्या सामन्यांमध्ये सट्टा लावल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या होत्या. त्यात अनेकांना अटकही करण्यात आली. परंतु सागर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील बीना येथील सब पोस्ट ऑफिसच्या एका पोस्ट मास्तरनं लोकांनी मेहनतीनं जमा केलेली रक्कम आयपीएलच्या सट्ट्यात उडवली. आता ग्राहक आपली जमा रक्कम मिळवण्यासाठी पासबुक घेऊन पोस्ट ऑफिसच्या फेऱ्या मारत आहेत. पोस्ट मास्तरनं अनेक ग्राहकांकडून घेतलेल्या लाखो रुपयांसाठी बनावट पासबुक आणि एफडी तयार केली होती. जेव्हा लोक पैसे काढण्यासाठी पोहोचले तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला. यापैकी काही ग्राहकांनी लग्नासाठी पैसे जमा केले होते. पोलिसांनी पोस्ट मास्तर विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही करण्यात आली आहे.

बीना सब पोस्ट ऑफिसच्या पोस्ट मास्तर विशाल अहिरवार याला २० मे रोजी जीआरपीनं अटक केलं. सध्या त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात त्यानं आयपीएलच्या सट्ट्यावर एक कोटीपेक्षा अधिक रक्कम उडवली असल्याचं कबुल केलं आहे.

पैशांसाठी लोकांच्या फेऱ्याआता आपले पैसे परत मिळवण्यासाठी लोक पोस्ट ऑफिसच्या फेऱ्या मारत आहेत. तसंच त्यांना या गोष्टीवर विश्वासही बसत नाही. कोरोना काळात आपल्या पतीला गमावणाऱ्या वर्षा बाथरी यांची कहाणी हृदयद्रावक आहे. कोरोना काळात त्यांच्या पतीचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या सासऱ्यांचंही निधन झालं. आपल्या पतीनं मुलांच्या भविष्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये ९ लाख रुपयांची एफडी केली होती. परंतु आता सर्वकाही गडबड झाल्याचं समजलं आहे. इकडे कोणीही उत्तर देत नाही. आता काय करावं? असं त्या म्हणाल्या.

तर दुसरीकडे वृद्ध महिला किशोरीबाई यांनी पै अन् पै जमवून आपल्या मुलींच्या लग्नासाठी पाच लाख रुपये जमा केलेहोते. परंतु आता पोस्ट ऑफिसमध्ये कोणी उत्तर देत नाही. जमा केलेल्या रकमेचीही माहिती नाही. आता पासबुक बनावट असल्याचं सांगत आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

टॅग्स :IPLआयपीएल २०२२Crime Newsगुन्हेगारीPost Officeपोस्ट ऑफिस