सराईत मोटारसायकल चोर जेरबंद, कल्याण गुन्हे शाखेची कामगिरी; ४ गुन्हे उघडकीस

By प्रशांत माने | Updated: March 31, 2024 13:57 IST2024-03-31T13:54:54+5:302024-03-31T13:57:00+5:30

चोरांकडून १ लाख १२ हजार रूपये किमतीच्या एकूण ४ मोटारसायकल जप्त केल्या

Motorcycle Thief arrested by Kalyan Crime Branch as 4 Crimes resolved | सराईत मोटारसायकल चोर जेरबंद, कल्याण गुन्हे शाखेची कामगिरी; ४ गुन्हे उघडकीस

सराईत मोटारसायकल चोर जेरबंद, कल्याण गुन्हे शाखेची कामगिरी; ४ गुन्हे उघडकीस

प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: रमजान ईब्राहीम शेख या सराईत मोटारसायकल चोराला जेरबंद करण्यात कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांना शनिवारी यश आले. शेख हा द्वारली गाव. ता. अंबरनाथ येथील राहणार असून त्यांच्याकडून १ लाख १२ हजार रूपये किमतीच्या एकुण ४ मोटारसायकल जप्त केल्या आहेत.

गुन्हे शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल मिथुन राठोड आणि विजेंद्र नवसारे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की डोंबिवली रामनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्हयातील मोटारसायकल घेवून एक व्यक्ती ठाकुर्ली ९० फुटी रोडवरील पत्रीपुलाजवळ येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक नरेश पवार, सहाय्यक पोलिस निरिक्षक संदीप चव्हाण, पोलिस हवालदार विश्वास माने, दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, अनुप कामत, पोलिस नाईक सचिन वानखेडे, पोलिस कॉन्स्टेबल गुरूनाथ जरग, मिथुन राठोड आणि विजेंद्र नवसारे आदिंनी त्या परिसरात सापळा लावला आणि संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. आरोपी रमजान याने चौकशीत रामनगरप्रमाणे खडकपाडा, वालीव, कोपरखैरणे पोलिस ठाणे हद्दीतुन आणखीन तीन मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्याला रामनगर पोलिसांच्या हवाली केले आहे.

यापूर्वी मोटारसायकल चोरीचे ८ गुन्हे दाखल

रमजान विरोधात यापुर्वी विष्णुनगर पोलिस ठाण्यात ४ , कोळसेवाडी पोलिस ठाण्यात २, महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात आणि खडकपाडा पोलिस ठाण्यात प्रत्येकी १ असे मोटारसायक चोरीचे एकुण ८ गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Motorcycle Thief arrested by Kalyan Crime Branch as 4 Crimes resolved