शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आईचा मृतदेह सापडला दिवाणात तर 28 किमी अंतरावर मुलगा आणि नातवाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 17:01 IST

Tripple Murder Case : मृत महिलेच्या मुलाचा आणि नातवाचा मृतदेह 28 किमी अंतरावर असलेल्या इंगोरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुरावडा गावात झुडपात पडलेले आढळले.

मध्य प्रदेशातील उज्जैन येथून तिहेरी हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे. वृद्ध महिलेसह तिचा मुलगा आणि नातवाची हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण जिवाजी गंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरिनगर येथील आहे. पोलिसांना महिलेचा मृतदेह दिवाणात बंद अवस्थेत आढळून आला असून तिचे हात-पाय बांधलेले होते. मृत महिलेच्या मुलाचा आणि नातवाचा मृतदेह 28 किमी अंतरावर असलेल्या इंगोरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुरावडा गावात झुडपात पडलेले आढळले.पोलिसांना मृत महिलेचा मुलगा आणि नातवाच्या मृतदेहाजवळ मोबाईल फोन आणि ओळखपत्र सापडले. त्या आधारे पोलीस मृताच्या घरी पोहोचले, तेथे त्यांना कुलूप असल्याचे दिसले. पोलिसांनी तपासासाठी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला असता खोलीतून दुर्गंधी येत होती. शोध घेत असताना दिवाणात एका वृद्ध महिलेचा मृतदेह पडलेला पोलिसांना दिसला. तात्काळ मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला.गेल्या चार-पाच दिवसांपासून कुटुंबातील एकही सदस्य दिसत नसल्याचे शेजारी राहणारे लोक सांगतात. पोलिसांनी एफएसएल टीमला पाचारण करून घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. वृद्ध महिलेच्या मृतदेहावर धारदार शस्त्राच्या खुणा आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच या प्रकरणाचा पर्दाफाश करण्याचा दावा केला जात आहे. त्याचवेळी अतिरिक्त एसपी आकाश भुरिया आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी या प्रकरणाचा तपास केला. शेजारी राहणाऱ्या लोकांनी सांगितले की, कुटुंबातील तिघांचा कोणाशीही फारसा संवाद नव्हता. तसेच ते कोणाशीही बोलत नव्हते. व्याजाने पैसे देण्याचे काम घरातील लोक करायचे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस