शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

दोन मुलांची आई १० वर्षांनी लहान दिराच्या प्रेमात पडली, त्यानंतर झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाले दोघांचे मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 18:05 IST

Crime News: एक महिला आणि एका पुरुषाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाल्याने खळबळ उडाली. या दोघांमध्ये दीर आणि वहिनीचे नाते होते.

रायपूर - छत्तीसगडमधील सूरजपूरमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाल्याने खळबळ उडाली. या दोघांमध्ये दीर आणि वहिनीचे नाते होते. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार ही महिला तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या दिराच्या प्रेमात पडली होती. दोघांनीही प्रेमप्रकरणातून समाजात बदनामी होईल म्हणून गळफास घेतला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवले आहेते. मृत महिला ही दोन मुलांची आई होती. (The mother of two Child fell in love with a young brother-in-law, after which their bodies were found hanging from a tree)

ही घटना मंगळवारी सकाळी रामानुजनगर पोलीस ठाणे क्षेत्रात घडली. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी महुआच्या झाडावर महिला आणि पुरुषांचा मृतदेह लटकलेले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. मृत महिलेचे नाव अनिता सिंह (३२) तर पुरुषाचे नाव शिवा सिंह (२२) असे असल्याचे तपासान उघड झाले. अनिता ही सोमवारी रात्री घरातून काही काम असल्याचे सांगून बाहेर पडली. पण माघारी आली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी रात्रभर तिचा शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. त्यानंतर मंगळवारी सकाळी कुणीतरी तिचा मृतदेह झाडाला लटकलेला असल्याचे दिसून आले.

मिळालेल्या माहितीनुसार अनिता आणि शिवा यांच्यात प्रेमप्रकरण सुरू होते. मात्र ही बाब लपून राहिली नाही. त्यांच्यातील प्रेमप्रकरणाची गावभर चर्चा सुरू झाली. त्यांच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याचे गावातील लोकांना माहिती झाले होते. ही बाबत त्यांच्या घरातल्यांना खटकत होती. अनिता ही शिवापेक्षा दहा वर्षांनी मोठी होती. तसेच तिला दोन मुलेही होती. त्यामुळेच या दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार प्राथमिकदृष्ट्या हा प्रकार प्रेम प्रकरणाचाच वाटत आहे. आता पुढील तपास सुरू आहे. आता पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChhattisgarhछत्तीसगड