बागेश्वर - उत्तराखंडच्या बागेश्वर येथे जैसर गावात आईच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका निर्दयी आईनं २२ दिवसांच्या पोटच्या पोरीची गळा दाबून हत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली. या मुलीच्या हत्येनंतर कुटुंबालाही मोठा धक्का बसला.
मृत मुलीचा आजोबा केशर सिंह यांनी मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला. तिथे डॉक्टरांनी मुलीचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे सांगितले. त्याआधारे केशर सिंह यांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये मुलीच्या आई विरोधात तक्रार केली. या घटनेत कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. कुटुंबातील लोकांनी म्हटलं की, आईने केलेले हे कृत्य अतिशय धक्कादायक आहे. यामुळे कुटुंबावर आघात झाला आहे. केशर सिंह यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस या घटनेची आणखी चौकशी करत आहेत.
केशर सिंह यांना २ मुले आहेत. त्यातील मोठा मुलगा परदेशात नोकरी करतो तर छोटा मुलगा घरच्यांना कामात मदत करतो. मोठ्या मुलाचं लग्न एप्रिल २०२५ रोजी झाले होते. लग्नानंतर ३ महिने सर्व काही ठीक सुरू होते. परंतु त्यानंतर सूनेने क्षुल्लक कारणावरून घरात वाद सुरू केला. तिच्या आई वडिलांनीही मुलीची बाजू घेत तांत्रिकाच्या सांगण्यावरून वेगवेगळे आरोप केले. ज्यामुळे घरात अशांतता होती. परंतु काही काळाने घरात पाळणा हलला. तेव्हाही सूनेचा सासू सासऱ्यांसोबत वाद सुरूच होता. सूनेच्या छळामुळे त्रस्त होऊन सासरे केशर सिंह यांनी सूनेविरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर महिला हेल्पलाईनवर कौन्सिलिंग करण्यात येत होते. मात्र सूनेने सासू सासऱ्यांविरोधात खोटी तक्रार दिल्याचा आरोप आहे.
घटनेच्या दिवशी सकाळी वन स्टॉप सेंटरचे काही कर्मचारी घरी आले होते. त्यांनी सासू सासरे आणि सूनेचे कौन्सिलिंग केले. ज्यात सूनेने सासू सासऱ्यांपासून वेगळे राहण्याचं लिखित मागणी केली. त्याच दिवशी संध्याकाळी २२ दिवसाच्या मुलीचा मृत्यू झाला. केशर सिंह यांनी मुलीचे पोस्टमोर्टम करण्याचा आग्रह धरला. त्यात गळा दाबल्याने तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी पुष्टी केली. या आधारे केशर सिंह यांनी सूनेविरोधात एफआयआर दाखल करत तिच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
Web Summary : In Bageshwar, a woman killed her 22-day-old daughter following disputes with her in-laws. The grandfather filed a police complaint, alleging the baby was strangled. Family conflicts and accusations preceded the tragic event, which occurred after counseling sessions and demands for separation.
Web Summary : बागेश्वर में एक महिला ने सास-ससुर से विवाद के बाद अपनी 22 दिन की बेटी का गला घोंट दिया। दादा ने पुलिस में शिकायत दर्ज कराई, जिसमें आरोप लगाया गया कि बच्ची का गला घोंटा गया था। पारिवारिक कलह और आरोपों के बाद यह दुखद घटना हुई, जो परामर्श सत्रों और अलगाव की मांगों के बाद हुई।