शहरं
Join us  
Trending Stories
1
Hayli Gubbi: भारतीयांच्या चिंतेत भर! भारतात आली इथियोपिया ज्वालामुखीची राख, महाराष्ट्रातील कोणत्या भागात ढग?
2
PM Modi: ११ फूट रुंद, २२ फूट लांब, १९१ फूट उंच; पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या शिखरावर फडकवणार भगवा ध्वज!
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, दर महिन्याला छोटी रक्कम जमा करा; ५ वर्षात बनेल १४ लाखांचा फंड
4
मोहम्मद पैगंबरांच्या केसासाठी १० लाखांचे दागिने गमावले, माहीममधील कुटुंबाची भामट्याकडून फसवणूक
5
T20 World Cup 2026 Schedule : कधी अन् कुठं रंगणार IND vs PAK यांच्यातील सामना? मोठी माहिती आली समोर
6
Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंचा भारत दौरा पुन्हा लांबणीवर! कारण काय? 
7
IND vs SA: गुवाहाटी कसोटीत भारताचा विजय अशक्य का? आतापर्यंत एकदाच गाठलाय ३००+ स्कोर!
8
धर्मेंद्र यांचे चाहते सनी-बॉबी देओलवर नाराज, म्हणाले- आयुष्यात त्यांचे सिनेमे पाहणार नाही !
9
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
10
'यमला पगला दीवाना' टायटल मीच धर्मेंद्र यांना दिलेलं..., सचिन पिळगावकरांनी सांगितला किस्सा
11
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
12
बिग बॉस मराठी ६ लवकरच...! अखेर झाली घोषणा, कोण असणार होस्ट? प्रेक्षकांची वाढली उत्सुकता
13
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
14
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
15
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
16
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
17
कुणावरही टीकाटिप्पणी नाही, केवळ विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री प्रचारात फडणवीसांचा व्हिजनवर भर, विरोधकांवरही टीका नाही
18
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
19
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
20
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
Daily Top 2Weekly Top 5

थंडी, रात्र आणि जंगल... दिराच्या प्रेमात वेड्या झालेल्या महिलेचं 3 मुलांसोबत धक्कादायक कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 16:50 IST

पोलिसांना रात्रीच्या वेळी जंगलाजवळ थंडीत 3 लहान मुलं कुडकुडताना दिसली. पोलिसांनी चौकशी केली असता मुलांनी वडिलांचं नाव आणि घरचा पत्ता सांगितला.

उत्तर प्रदेशच्या श्रावस्ती पोलिसांना रात्रीच्या वेळी जंगलाजवळ थंडीत 3 लहान मुलं कुडकुडताना दिसली. पोलिसांनी चौकशी केली असता मुलांनी वडिलांचं नाव आणि घरचा पत्ता सांगितला. यानंतर पोलिसांनी त्यांना सर्वप्रथम पोलीस ठाण्यात नेलं, उबदार कपडे आणि खाण्यासाठी काही वस्तू दिल्या. त्यानंतर त्या मुलांना घरी नेण्यात आलं. याच दरम्यान मुलांनी आईबद्दल जे सांगितलं ते ऐकून पोलीसही हैराण झाले.

श्रावस्ती जिल्ह्यातील भिनगा कोतवाली भागातील एका गावातील एक महिला 3 मुलांसह तिच्याच दिरासोबत 6 महिन्यांपूर्वी पळून गेली होती. ती लखनौमध्ये तिची मुलं आणि प्रियकरासह राहत होती. अचानक एका रात्री ही महिला प्रियकरासह श्रावस्ती येथे पोहोचली. येथे तिने आपल्या तीन मुलांना जंगलाजवळ सोडलं. यानंतर ती तिच्या प्रियकरासह फरार झाली.

पोलीस गस्त घालत असताना त्याच मार्गावरून गेले. तेव्हा थंडीत कुडकुडत असलेली तीन मुलं पोलिसांना दिसली. पोलिसांनी त्यांची गाडी थांबवली आणि त्यांना आपल्यासोबत पोलीस ठाण्यात नेलं. तेथे त्यांना उबदार कपडे, बिस्किटं आणि फळं देण्यात आली. चौकशीत मुलांनी सांगितलं की, आई आणि काका लखनौमध्ये राहतात. त्यांनी रात्री बसने आम्हाला आणलं आणि जंगलाजवळ सोडलं. यासोबतच मुलांनी घराचा पत्ता सांगितला.

पोलिसांनी त्यानंतर मुलांना आजी-आजोबांच्या ताब्यात दिलं. तसेच संबंधित महिला आणि तिच्या प्रियकरावर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या कामासाठी पोलीस पथकाला बक्षीस देण्याची घोषणा एसपींनी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी