शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

दोन मुलांची आई तरूणासोबत घर सोडून पळाली, काही दिवसांनी तिला स्टेशनवर सोडून प्रियकर फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 16:29 IST

Boyfriend run away : ऑनलाईन प्रेमात आंधळ्या झालेल्या महिलेला प्रियकर दिल्ली स्टेशनवर सोडून फरार झाला. सगळं काही गमावून बसलेली महिला आता न्यायाची मागणी करत पोलिसांकडे पोहोचली आहे.

Boyfriend run away : ऑनलाईन जुळलेल्या प्रेमातून फसवणूक किंवा दगा देण्याच्या घटना नेहमीच समोर येत असतात. अशीच एक घटना समोर आली असून महिला आता न्यायाची मागणी करत आहे. दोन मुलांची आई फेसबुकवर एका तरूणाच्या प्रेमात पडली. ती इतकी प्रेमात होती की, दोन्ही मुलांना सोडून महिला प्रियकरासोबत समस्तीपूरहून हरयाणाला फरार झाली. दोघेही तिथे पती-पत्नीसारखे राहू लागले. पण त्यांचं हे प्रेम जास्त दिवस टिकू शकलं नाही आणि प्रियकराने तिला दगा दिला.

ऑनलाईन प्रेमात आंधळ्या झालेल्या महिलेला प्रियकर दिल्ली स्टेशनवर सोडून फरार झाला. सगळं काही गमावून बसलेली महिला आता न्यायाची मागणी करत पोलिसांकडे पोहोचली आहे. दोन मुलांची आई असलेल्या या महिलेची समस्तीपूर जिल्ह्यातील विभूतिपूरमध्ये राहणाऱ्या तरूणासोबत फेसबुकवर ओळख झाली होती.

त्यानंतर दोघे चॅटींग करू लागले आणि प्रेमात पडले. चॅंटींगची जागा आणि मोबाइल नंबर शेअर करून व्हिडीओ कॉलने घेतली होती. दोघेही सोबत जगण्या-मरण्याच्या शपथा घेऊ लागले होते. दरम्यान तरूणाने महिलेला भेटण्यासाठी सहरसा येथे बोलवलं आणि तिथे दोघांनी शारीरिक संबंध ठेवले.नंतर तरूणाने महिलेला लग्नाचं आमिष दाखवत समस्तीपूरला बोलवलं. महिला कशाचाही विचार न करता दोन्ही मुलांना सोडून समस्तीपूरला पोहोचली. तिथून अजय पासवान महिलेला घेऊन हरयाणाच्या करनालमध्ये गेला. इथे दोघेही पती-पत्नीसारखे राहत होते.

दोन महिने दोघांमध्ये सगळं काही ठीक सुरू होतं. नंतर प्रियकर महिलेला म्हणाला की, आता आपण गावात जाऊनच राहू. त्यासाठी महिलाही तयार झाली. पीडित महिलेनुसार, चार दिवसाआधी दोघेही हरयाणाहून दिल्ली स्टेशनला पोहोचले. दरम्यान अजय पाणी आणण्यासाठी गेला तर परत आलाच नाही. 

आता सगळं काही गमावून बसलेल्या महिलेला माहेरी आणि सासरच्या लोकांनी ठेवून घेण्यास नकार दिला. पीडित महिलेनुसार, अजयसोबत पळून गेल्याची माहिती तिच्या सासरी आणि माहेरी मिळाली होती. त्यामुळे मला साथ देण्यास नकार दिला. आता ती न्यायासाठी पोलिसांकडे मागणी करत आहे.

टॅग्स :HaryanaहरयाणाCrime Newsगुन्हेगारी