शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

आईने सोडले बापाने छळले; चाइल्ड लाइनने दिला आधार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 19:34 IST

तिन्ही मुले शासकीय बालगृहात : पुढील भवितव्य झाले सुरक्षित

ठळक मुद्दे नरकयातनेतून चाइल्ड लाइनने सोडवून शासकीय बालगृहात दाखल केले. मंगेश त्यांचा योग्य सांभाळ करण्याऐवजी मद्यधुंद अवस्थेत त्यांना मारहाण करीत होता. तीन मुलांसह नवऱ्याला त्याची पत्नी अनेक वर्षांपासून सोडून गेली आहे.

धीरेंद्र चाकोलकर 

अमरावती - आई-वडील मुलांसाठी खस्ता खातात. मात्र, खरकाडीपुऱ्यातील तिघा भावंडाना आईने बालपणी सोडले, तर मद्यपी बाप बदल्याच्या भावनेतून त्यांचा छळ करीत होता. त्यांना या नरकयातनेतून चाइल्ड लाइनने सोडवून शासकीय बालगृहात दाखल केले. यामुळे त्यांच्या शिक्षणाचा, भयमुक्त जीवनाचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगेश रंधवे असे मद्यपी बापाचे नाव आहे. त्याला १० वर्षांचा मुलगा, तर सात आणि पाच वर्षांच्या दोन मुली आहेत. या तीन मुलांसह नवऱ्याला त्याची पत्नी अनेक वर्षांपासून सोडून गेली आहे. मंगेश त्यांचा योग्य सांभाळ करण्याऐवजी मद्यधुंद अवस्थेत त्यांना मारहाण करीत होता. याशिवाय त्यांना शाळेत जाण्यास मनाई करून शिक्षणापासून वंचित ठेवले होता. या मुलांचे पालनपोषण योग्य होत नसल्याचे संपर्क व्यक्तीने १०९८ या क्रमांकावर कळविले होते. त्यामुळे चाइल्ड लाइनने या मुलांना दारूड्या बापाच्या तावडीतून सोडविण्याच्या कार्यवाहीस प्रारंभ केला. सहायक पोलीस निरीक्षक सोनू झामरे यांच्या नेतृत्वातील खोलापुरी गेट पोलिसांच्या मदतीने चाइल्ड लाइनच्या सदस्यांनी मुलांना गाठले आणि त्यांचे सांत्वन व समुपदेशन केले. या प्रकरणाची माहिती बाल कल्याण समितीलाही देण्यात आली. पोलिसांच्या साहाय्याने या मुलांची जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्यांची अमरावती येथील शासकीय बालगृहात व्यवस्था करण्यात आली.  श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, सचिव माधुरी चेंडके, चाइल्ड लाइन संचालक सूर्यकांत पाटील, प्रशांत घुलक्षे तसेच समुपदेशक अमित कपूर, चमू सदस्य शंकर वाघमारे, मीरा राजगुरे, पंकज शिनगारे, सरिता राऊत, सुरेंद्र मेश्राम व चेतन वटके यांनी प्रकरणाचा वेळोवेळी पाठपुरावा घेतला.

सदर तीन मुलांच्या पुढील शिक्षणासाठी व्यवस्था केली जाईल. मुलांना कुठलीही समस्या, मदत लागल्यास चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८ वर विनामूल्य संपर्क करावा. संपर्क व्यक्तीचे नाव गुप्त ठेवले जाईल.  - फाल्गुन पालकर, समन्वयक, चाइल्ड लाइन

टॅग्स :AmravatiअमरावतीPoliceपोलिस