शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बायकोला घरी पाठवत नसल्याच्या रागातून जावयाने केली सासूची हत्या; धारदार सुऱ्याने केले वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 08:26 IST

हे प्रकरण १६ जुलैच्या रात्रीचं आहे. मोहन गार्डन पोलीस ठाण्यात आरोपी रवीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देचार दिवसांपूर्वी आरोपीने दुकानातूनबर्फ तोडणारा सूरा खरेदी केला. बेसावध असताना जावई रवीने सासूवर धारदार सुऱ्याने वार केले सासूचा मृत्यू तर घटनेत इतर ३ जण जखमी

नवी दिल्ली – क्षुल्लक कारणावरुन जावयाने सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बायकोला घरी पाठवत नसल्याच्या रागातून नवऱ्याने सासूवर चाकूने वार करत तिची हत्या केली.जावयाचं ते रौद्र रुप पाहून आसपासच्या लोकांनीही आरोपीला अडवण्याची हिंमत केली नाही. महिलेच्या मुलीने, मुलाने आणि नवऱ्याने वाचवण्याचे प्रयत्न केले असता त्यांनाही आरोपीने जखमी केलं.

हे प्रकरण १६ जुलैच्या रात्रीचं आहे. मोहन गार्डन पोलीस ठाण्यात आरोपी रवीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार घटना घडल्यानंतर काही क्षणात पोलीस घटनास्थळी पोहचले होते, घटनास्थळापासून काही अंतरावरच पोलीस  बीट चौकी होती. तपासात जावई रवीने सासूवर बर्फ तोडणाऱ्या चाकूने अनेक वार केले होते अशी माहिती मिळाल्यानंतर तात्काळ जावयाला अटक करण्यात आली. रवी(३८) ने त्याची पत्नी, मुले आणि सासऱ्यालाही जखमी केले आहे. पोलिसांनी जखमींना जवळच्या तारक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

डॉक्टरांनी सासू शशिबाला(६२) यांना मृत घोषित केले आहे. तर अन्य ३ जखमींवर डीडीयू रुग्णालयात उपचारासाठी हलवलं असल्याची माहिती दिली. आरोपी रवीवर मादक पदार्थांचे सेवन, खंडणी, हत्येचा प्रयत्न आणि बलात्कार यासारखे गुन्हे यापूर्वीही नोंद आहेत. तो काही काळ तुरूंगातही होता. २०१९ मध्ये पोक्सो आणि बलात्कार प्रकरणात त्याने ९ महिने तुरूंगात घालविला. २६ नोव्हेंबर २०१९ रोजी, तुरूंगातून बाहेर आल्यानंतर त्याला कळले की त्याची पत्नी आणि मुलगी माहेरी गेली आहे. या सर्व गोष्टीमागे त्याची सासूच जबाबदार असल्याचे त्याला वाटले. तेव्हापासून सासूला वाटेतून काढण्याचा त्याचा डाव होता असं पोलीस तपासात उघड झालं आहे.

चार दिवसांपूर्वी दुकानातून त्याने बर्फ तोडणारा चाकू खरेदी केला. १६ जुलै रोजी रात्री सासू तिच्या नातेवाईकांना सोडण्यासाठी घराबाहेर आली, त्यावेळी दबा धरुन बसलेल्या आरोपी रवीला हत्या करण्याची संधी मिळाली. घटनेवेळी त्याची पत्नी आणि मुलगा काही अंतरावर उभे होते. त्यावेळी अचानक रवीने सासूवर चाकूने वार करत जागेवरच तिची हत्या केली, यावेळी रवीला अडवण्यासाठी आलेल्या ३ जणांवरही रवीने चाकूने प्रहार केला. यात तिघेही जखमी झालेत.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस