शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
3
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
4
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
5
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
6
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
7
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
8
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
9
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
10
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
11
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
12
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
13
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
14
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
15
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
16
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
18
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
19
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
20
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक

नालासोपाऱ्यात मुलगी गर्भवती राहिल्याने आईने केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 06:51 IST

नालासोपारा पोलिसांनी आरोपी महिला ममता दुबेला शनिवारी अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : मुलगी गर्भवती राहिल्याने संतप्त झालेल्या आईने मुलीची गळा दाबून हत्या केली आहे. शवविच्छेदन अहवालातून हा प्रकार उघडकीस आला. हत्या करण्यास तिच्या अल्पवयीन बहिणीनेही आईला मदत केली. नालासोपारा पोलिसांनी आरोपी महिला ममता दुबेला शनिवारी अटक केली आहे.

महाविद्यालयात शिकणारी अस्मिता दुबे (२०) ही तरुणी जय विजयनगरी या इमारतीत राहत होती. गुरुवारी दुपारी तिच्या पोटात दुखू लागले आणि त्यामुळे अचानक तिचा मृत्यू झाल्याची फिर्याद तिची आई ममता (४६) हिने पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला. मात्र तिचा चेहरा सुजलेला होता. तसेच दोन्ही हातावर चावा घेतल्याची खूण होती. त्यामुळे संशय आल्याने पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात दाखल केला. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर अस्मिताचा मृत्यू गळा आवळून केल्याचे निष्पन्न झाले. 

संताप अनावर; मुलीला मारहाणमृत अस्मिता ही तीन महिन्यांची गर्भवती राहिल्याचे तिच्या आईला समजल्याने ती संतापली होती. तिने मुलीला गर्भपात करण्यास सांगितले होते. मात्र तिने नकार दिला. त्यानंतर तिने मुलीला बेदम मारहाण केली. तिची १७ वर्षीय लहान बहिणीने तिचे पाय धरले तर आई अस्मिताने दोन्ही हातांवर चावा घेतला, तसेच दोरीने गळा आवळून तिची हत्या केल्याचे नालासोपाऱ्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विशाल वळवी यांनी सांगितले. 

याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी ममता दुबे हिच्यावर शनिवारी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तिची बहीण अल्पवयीन असून तिची १२वीची परीक्षा सुरू आहे. आई ममता दुबे हिला न्यायालयात हजर केले असता, २५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक अमरसिंह यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी