Mother in Law - Son in Law Crime News: ग्रेटर नोएडामध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. एक अतिशय घृणास्पद प्रकार समोर आला आहे. एका जावयावर त्याच्या विधवा सासूने बलात्काराचा आरोप तसेच त्या कृतीचा अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप केला आहे. पीडित महिलेने आरोपी जावयाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीवरून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
नेमकी तक्रार काय?
पोलिसांना दिलेल्या तक्रारीत, राबुपुरा येथे राहणाऱ्या एका विधवा महिलेने तिच्याच जावयावर कोल्ड्रिंक मध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. महिलेचे म्हणणे आहे की आरोपीने तिचा अश्लील व्हिडिओही बनवला आहे.
तब्येत बिघडल्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये घेऊन गेला...
सासूने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, म्हणण्यानुसार, आरोपी आणि महिलेच्या एकुलत्या एका मुलीचे लग्न झालेले आहे. जावई आणि सासू दोघे कारने दिल्लीला जात होते. वाटेत जावयाने तब्येत बिघडल्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये खोली घेतली. तिथे त्याने सासूला कोल्ड्रिंक प्यायला दिले, जे पिऊन ती बेशुद्ध पडली. याचाच गैरफायदा घेत जावयाने बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर बलात्कार केला आणि तिचा अश्लील व्हिडिओही बनवला.
ब्लॅकमेलिंग; सतत दुष्कृत्य
जेव्हा सासू शुद्धीवर आली आणि तिने विरोध केला, तेव्हा जावयाने तिला अश्लील व्हिडिओ दाखवून गप्प राहण्याची धमकी दिली. या भीतीमुळे तिने याबद्दल कोणालाही सांगितले नाही. पण याचा फायदा घेत आरोपी जावयाने नंतर तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला आणि तिच्या मालमत्तेच्या कागदपत्रांवरही सह्या घेतल्या.
मुलीचा संसार वाचवायला आधी राहिली गप्प, पण मग...
मुलीचे घर वाचवण्यासाठी सासू शांतपणे सर्वकाही सहन करत राहिली. एकदा तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला. परंतु हल्ली महिलेची मुलगी आणि जावयामध्ये वाद व्हायला सुरूवात झाली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.